बळीराजा सुखावला... विश्रांती घेतलेला मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 05:28 AM2023-09-24T05:28:51+5:302023-09-24T05:29:37+5:30

मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भात ३० सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता कायम राहील.

Rested Monsoon is active again in the state | बळीराजा सुखावला... विश्रांती घेतलेला मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय

बळीराजा सुखावला... विश्रांती घेतलेला मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : मुंबईसह राज्यभरात मधल्या काळात विश्रांतीवर असलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, पुढील चार ते पाच दिवस मराठवाडा आणि लगतच्या भागांत काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. तर, मुंबईत पावसाचा जोर कायम नसला, तरी शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने मुंबईकर कंटाळले होते.

मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भात ३० सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता कायम राहील. मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक ते सोलापूरपर्यंतच्या १० व मराठवाड्यातील सर्व ८ अशा एकूण १८ जिल्ह्यांमध्ये रविवारी, सोमवारी पावसाचा जोर काहीसा कमी होईल. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरच्या १० दिवसांत पुन्हा या विभागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

Web Title: Rested Monsoon is active again in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.