एमआयएमच्या आक्रमकतेला लगाम

By admin | Published: April 17, 2015 12:17 AM2015-04-17T00:17:14+5:302015-04-17T00:17:14+5:30

वांद्रे (पूर्व) पोटनिवडणुकीच्या निकालाने एकीकडे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राजकारणाला खो बसला आहे.

Restraining the MIM aggression | एमआयएमच्या आक्रमकतेला लगाम

एमआयएमच्या आक्रमकतेला लगाम

Next

जमीर काझी ल्ल मुंबई
वांद्रे (पूर्व) पोटनिवडणुकीच्या निकालाने एकीकडे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राजकारणाला खो बसला आहे. तर दुसरीकडे मुंबईतील मुस्लीम पट्ट्यात शिरकाव करण्याच्या एमआयएमच्या उद्दिष्टाला लगाम लागला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी प्रत्येक मुस्लीम बहुलवस्ती असलेल्या परिसरात आक्रमकपणे संघटना विस्ताराचे त्यांचे मनसुबे होते. मात्र मुस्लिमांनी ओवेसी बंधूंच्या आक्रमक व विद्वेषी विचारांना झिडकारल्याने त्याला मोठी खीळ बसली आहे.
पोटनिवडणुकीच्या निमित्ताने वांद्रेतही पक्षाचा जोर वाढवून कॉँग्रेस व सपाची मते मिळवायची असा ओवेसी बंधूंचा विचार होता. पण अपेक्षित मते मिळणे दूरच तर पण रहेबर खान यांना डिपॉझिटही राखता आले नाही. त्यामुळे केवळ विखारी भाषण देऊन तरुणांच्या भावना भडकविण्याऐवजी त्यांना रोजगार, विकासासाठी ठोस कार्यक्रम देण्याची आवश्यकता आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वांद्रे पोटनिवडणुकीचा निकाल नारायण राणे आणि एमआयएमसाठी धक्कादायक ठरला. कॉँग्रेसला मात्र हा निकाल काहीसा दिलासा देणारा आहे. राणे पूर्ण तयारीनिशी उतरले असले, तरी शिवसेना बाजी मारेल, अशी शक्यता काँग्रेसच्याच एका गटाकडून निकालाच्या आदल्या रात्रीपर्यंत वर्तविली जात होती. राणे कुठपर्यंत मजल मारतात, हे काँग्रेससाठी महत्त्वाचे होते. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसला १२ हजार २२९ मते मिळाली होती. राणेंनी हा आकडा जवळपास तिप्पटीने म्हणजे ३३ हजार ३०३ पर्यंत पोहचवला. राणेंच्या पराभवाचे शल्य असले तरी मतात झालेल्या भरघोस वाढीमुळे काँग्रेसमध्ये काहीसे समाधानही मानले जात आहे. या मतदारसंघातील ७ पैकी निर्मलनगर खार व खेरवाडी या वॉर्डात कॉँग्रेसचे दोन नगरसेवक आहेत. त्याठिकाणी कॉँग्रेसला निम्म्याहून जादा मते मिळाल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास उंचावला आहे.
आॅक्टोबरच्या निवडणुकीत ज्या बेहराम पाडा, गोळीबार मैदान व भारतनगर परिसरात ‘एमआयएम’ला प्रत्येक मतदान केंद्रातून हजारावर मते मिळाली होती. त्याच ठिकाणी यंदा मतांचे प्रमाण घसरले आहे. दोन्हीवेळी रहेबर खान हेच रिंगणात असल्याने त्यांना मतदारांनी झिडकारल्याचे मान्यच करावे लागेल. ओवेसी बंधूंनी मतदारसंघातील मुस्लीम वस्त्यांमध्ये ठिय्या मांंडला होता. गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी दुपटीने सभा व रॅली घेऊन त्यांनी मतदारांना भावनिक आवाहन केले होते. त्यामुळे याठिकाणाहून जिंकता आले नाही तरी, मतांचा आकडा ३० हजारांवर पोहोचेल, असा त्यांचा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र भडक भाषणांना मतदारांनी नाकारले आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या मतांमध्ये तब्बल साडेआठ हजार मतांनी घट झाली.
पोटनिवडणुकीच्या निमित्ताने वातावरणनिर्मिती करून महापालिका निवडणुकांपर्यंत मुस्लीम वस्त्यांमध्ये पक्षाची ताकद वाढवायच्या त्यांच्या इराद्याला अल्प मतामुळे धक्का बसला आहे. मुस्लीम मतदार पुन्हा पक्षाकडे वळल्याने कॉँग्रेसला समाधान वाटत आहे.

च्आॅक्टोबरच्या निवडणुकीत ज्या बेहराम पाडा, गोळीबार मैदान व भारतनगर परिसरात ‘एमआयएम’ला प्रत्येक मतदान केंद्रातून हजारावर मते मिळाली होती. त्याच ठिकाणी यंदा मतांचे प्रमाण घसरले आहे. दोन्हीवेळी रहेबर खान हेच रिंगणात असल्याने त्यांना मतदारांनी झिडकारल्याचे मान्यच करावे लागेल.
च्अपेक्षित मते मिळणे दूरच तर पण रहेबर खान यांना डिपॉझिटही राखता आले नाही.

पोटनिवडणूक भावनिकतेच्या मुद्यावर लढली गेल्याने पक्षाला अपेक्षित मतदान झाले नाही. तरीही मतदानाचे प्रमाण घसरण्याच्या नेमक्या बाबींचा शोध घेऊन आम्ही पुन्हा संघटना बांधणीच्या कामाला लागणार आहोत.
- अ‍ॅड. वारिस पठाण, आमदार, एमआयएम

Web Title: Restraining the MIM aggression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.