Join us

लाउडस्पीकरवर बंदी घालण्यापेक्षा निर्बंध आणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 3:05 AM

लाउडस्पीकर वाजवण्यासाठी गणेशोत्सवात पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात येत असल्याची तीव्र नाराजी प्रोफेशनल आॅडिओ अ‍ॅण्ड लायटिंग असोसिएशनने (पाला) व्यक्त केली आहे.

मुंबई : लाउडस्पीकर वाजवण्यासाठी गणेशोत्सवात पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात येत असल्याची तीव्र नाराजी प्रोफेशनल आॅडिओ अ‍ॅण्ड लायटिंग असोसिएशनने (पाला) व्यक्त केली आहे. बंदीबाबत सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचे कोणतेही आदेश नसताना राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकामुळे पोलिसांकडून परवानगी नाकारली जात असल्याचा आरोप पालाचे खजिनदार झुरा ब्रॅगँझा यांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लाउडस्पीकरविरोधात कारवाई करताना नियमांचे पालन होत नसल्याचेही ब्रॅगँझा यांचे म्हणणे आहे.ब्रॅगँझा यांनी सांगितले की, १९८६ साली तयार केलेल्या नियमावलीची अंमलबजावणी २०००मध्ये सुरू झाली. मात्र ही नियमावली आता कालबाह्य झाली आहे. मुळात कायद्यात सांगितल्याप्रमाणे कोणत्याही औद्योगिक क्षेत्रात सरासरी ७५ डेसिबल मर्यादेपर्यंत आवाज करण्यास परवानगी आहे. मात्र या मर्यादेला एलईक्यू अर्थात सरासरीचा नियम लावण्यात आला आहे. तरीही काही सामाजिक कार्यकर्ते व पोलीस यंत्रणा लाउडस्पीकरला आवाज मोजणारे मशीन लावून ध्वनीची तीव्रता मोजतात. मुळात लाउडस्पीकरपासून ५० फुुटांपर्यंत गेल्यास ६ डेसिबलने ध्वनीची तीव्रता कमी होते. याच पटीत लाउडस्पीकरपासून असलेल्या दूरच्या अंतरापर्यंत जाणाऱ्या ध्वनीचा परिणामही कमी असतो. तरीही लाउडस्पीकरला मशीन लाऊन चालकांवर कारवाई केली जात आहे.नियमांचे उल्लंघन करणाºयांवर पोलिसांनी जरूर कारवाई करावी, अशी पालाची भूमिका आहे. मात्र नियमांचे पालन करणाºया वादकांना परवानगी देण्याची मागणीही संघटनेने केली आहे. शिवाय आवाजाच्या मर्यादेला ७५ऐवजी ९० डेसिबलपर्यंत सूट देण्याचे आवाहनही संघटनेने केले आहे. अर्थात लाउडस्पीकरवर सरसकट बंदी लादण्याऐवजी प्रशासनाने यामध्ये कठोर नियमावली तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी ‘पाला’ने केली आहे.

टॅग्स :गणेश चतुर्थी २०१८गणेशोत्सव