Join us

दारुचा ग्लास डोक्यावर ठेवून नाचण्यास विरोध, गोरेगाव स्पोर्ट्स क्लबमध्ये हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 11:40 IST

थर्टी फर्स्टच्या रात्री गोरेगाव स्पोर्ट्स क्लबमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाली.

मुंबई : थर्टी फर्स्टच्या रात्री गोरेगाव स्पोर्ट्स क्लबमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाली. क्लबचा सभासद नसलेला व्यक्ती डोक्यावर दारूचा ग्लास ठेवत नाचताना त्याला सभासद विरोध करू लागले. तेव्हा हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी सदर व्यक्तीसह क्लबच्या मेंबरवरही गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. 

अजय शर्मा (४२) याच्या तक्रारीनुसार, ३१ डिसेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास तो कुटुंबासोबत गोरेगाव स्पोर्ट्स क्लबमध्ये नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करायला आला होता.  त्यावेळी ही घटना घडली. 

 जीएससीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या रेस्टॉरंटमध्ये राजेश चंद्रबजाज हा कापड व्यावसायिक त्या ठिकाणी डोक्यावर दारूचा ग्लास ठेवून नाचू लागला. शर्माच्या म्हणण्यानुसार, राजेश हा महिला आणि मुले असलेल्या भागात मागे येऊन नाचू लागला. ज्याला त्यांनी विरोध केला ते मात्र ऐकत नव्हता. 

 याची तक्रार त्यांनी क्लबचा मॅनेजर शेट्टी याला केल्यावर सुरक्षारक्षक आणि हस्तक्षेप करत शांतता ठेवण्याची सर्वांना विनंती केली. 

 गेटवर आल्यानंतर त्याने शर्माला  मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर शर्माने शताब्दी रुग्णालयात उपचार घेत असून बांगूर नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :गोरेगावनववर्ष