भारतीय प्रवाशांवर निर्बंध लावल्याने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:08 AM2021-05-05T04:08:48+5:302021-05-05T04:08:48+5:30
भारतीय प्रवाशांवर निर्बंध लावल्याने अमेरिकेला जाणारी विमाने रद्द लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे अमेरिकेने भारतीय प्रवाशांवर ...
भारतीय प्रवाशांवर निर्बंध लावल्याने अमेरिकेला जाणारी विमाने रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे अमेरिकेने भारतीय प्रवाशांवर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाने अमेरिकेला जाणारी विमाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू विमानतळावरून होणाऱ्या उड्डाणांचा समावेश आहे.
४ मेपासून पुढील ३० दिवस अमेरिकेत भारतीय प्रवाशांना प्रवेश दिला जाणार नाही. ३० दिवसांनतर कोरोना स्थितीचा आढावा घेऊन निर्बंध शिथिल करण्याबाबात निर्णय घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेला ये-जा करणाऱ्या नियोजित विमान फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतला. कोरोनाकाळात एअर इंडिया आणि युनायटेड एअर लाईन्स या दोनच विमान कंपन्या भारत-अमेरिका थेट सेवा देत आहेत.
अमेरिकेतील निर्बंधांमुळे मुंबई - न्यूयॉर्क, दिल्ली - वॉशिग्टन डीसी, दिल्ली - शिकागो, दिल्ली - सॅनफ्रॅन्सिस्को, बंगळुरू - सॅनफ्रॅन्सिस्को, दिल्ली - न्यूयॉर्क या विमानफेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती एअर इंडियाने दिली.
...........................................