आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीवरील निर्बंधांत ३० जूनपर्यंत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:06 AM2021-05-29T04:06:26+5:302021-05-29T04:06:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशातील कोरोना प्रादुर्भाव अद्याप नियंत्रणात न आल्याने आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीवरील निर्बंधांमध्ये वाढ करण्याचा निर्णय ...

Restrictions on international passenger transport extended till June 30 | आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीवरील निर्बंधांत ३० जूनपर्यंत वाढ

आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीवरील निर्बंधांत ३० जूनपर्यंत वाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशातील कोरोना प्रादुर्भाव अद्याप नियंत्रणात न आल्याने आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीवरील निर्बंधांमध्ये वाढ करण्याचा निर्णय नागरी उड्डयन निर्देशनालयाने (डीजीसीए) घेतला आहे. त्यानुसार ३० जूनपर्यंत हे निर्बंध कायम राहतील.

लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर २५ मे २०२०पासून देशांतर्गत विमान वाहतुकीला परवानगी देण्यात आली हाेती. परंतु, आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध कायम हाेते. गेल्या महिन्यात ‘डीजीसीए’ने काढलेल्या अधिसूचनेनुसार आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध ३१ मेपर्यंत कायम राहणार होते. परंतु, अद्याप कोरोना स्थिती फारशी आटोक्यात आली नसल्याने त्यात ३० जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी ‘डीजीसीए’ने त्या संदर्भातील आदेश जारी केले.

दरम्यान, या निर्बंधांतून काही ठराविक शेड्यूल्ड विमानांना सूट देण्यात येईल. तसेच सर्वप्रकारची मालवाहतूक कोणत्याही निर्बंधांविना सुरू राहणार असल्याचे ‘डीजीसीए’ने स्पष्ट केले.

..........................

Web Title: Restrictions on international passenger transport extended till June 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.