सरकारकडून निकषांमध्ये बदल, राज्यात उद्यापासून असतील असे निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 08:12 AM2021-06-27T08:12:20+5:302021-06-27T08:13:02+5:30

निकषांमध्ये बदल; हॉटेल, धार्मिक स्थळांसाठी नियमावली

Restrictions that will be in place in the state from tomorrow | सरकारकडून निकषांमध्ये बदल, राज्यात उद्यापासून असतील असे निर्बंध

सरकारकडून निकषांमध्ये बदल, राज्यात उद्यापासून असतील असे निर्बंध

Next
ठळक मुद्देखासगी प्रशिक्षण वर्ग, कौशल्य केंद्रे 

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत ‘ब्रेक दि चैन’ अंतर्गत ४ जून २०२१ पासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये विस्तार करताना जमाव व मेळावे, धार्मिक स्थळ, खासगी प्रशिक्षण वर्ग कौशल्य केंद्रे, हॉटेल, पर्यटन स्थळांसंदर्भात काही क्षेत्रांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

जमावबंदी कशी असेल?
nजमावबंदीच्या आदेशानुसार आपत्ती म्हणून कोविड-१९ जोपर्यंत अस्तित्वात असेल, तोपर्यंत १०० पेक्षा जास्त लोकांच्या जमावावर पूर्णपणे बंदी असेल. बांधकाम होत असलेल्या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त संख्येने काम करता येणार नाही. 
nखुल्या जागेच्या ठिकाणीही क्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त लोकांना काम करता येणार नाही. कोणत्याही संमेलन अथवा मेळाव्याचा कालावधी तीन तासांपेक्षा जास्त असू शकणार नाही. एखाद्या आस्थापनेच्या ठिकाणी एकापेक्षा जास्त कार्यक्रम असतील तर कार्यक्रमांमध्ये पुरेसा कालावधी असावा.
nसंमेलन अथवा मेळावे होत असलेल्या ठिकाणी वेळोवेळी सादर केलेले एसओपीचे काटेकोरपणे पालन करावे आणि असे होत नसल्याचे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. 
nवारंवार मार्गदर्शक एसओपींचे उल्लंघन होत असेल तर त्या आस्थापनेला पूर्णपणे बंद केले जाईल आणि कोविड आपत्ती असेपर्यंत या आस्थापनांना उघडण्याची मुभा मिळणार नाही. जर एखाद्या ठिकाणी खाण्यापिण्यासह संमेलन असेल अशा ठिकाणी उपाहारगृहांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची  अंमलबजावणी केली जाईल. 

धार्मिक स्थळे 
nस्तर तीन, चार आणि पाचमध्ये सर्व धार्मिक स्थळे अभ्यागतांसाठी बंद असतील.
nजमावाचे सर्व नियम पाळून स्तर एकमधील अभ्यागतांना धार्मिक स्थळे खुले असतील.
nस्तर तीन, चार आणि पाचमध्ये बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी धार्मिक स्थळे बंद असतील. जेथे लग्नकार्य आणि अंतिम संस्कार केले जात असतील, अशा धार्मिक स्थळी जमावासाठी लागू असलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. 
nकोणत्याही धार्मिक कार्य किंवा पवित्र दिवसाच्या निमित्ताने काही विशेष कार्य असल्यास त्या धार्मिक स्थळाला सर्व नियमांचे पालन करून ते पार पाडावे लागतील.

खासगी प्रशिक्षण वर्ग, कौशल्य केंद्रे 
शाळा, महाविद्यालय किंवा इतर शैक्षणिक संस्थांसाठी असलेले नियम खासगी प्रशिक्षण वर्ग अर्थात कोचिंग क्लासेस आणि कौशल्य केंद्रांसाठी लागू असेल. अपवाद : कोविड-१९ च्या व्यवस्थापनासाठी, वैद्य कौशल्याचे प्रशिक्षण अभ्यासक्रम चालवणारे कौशल्य केंद्रे हे अपवाद असतील. अशा प्रकारच्या वर्गांवर कोणतेही निर्बंध नसतील. क्षमतेच्या अटीवर हॉटेलमधील उपहारगृहे हे त्या ठिकाणी राहणाऱ्या पाहुण्यांसाठी चालू राहतील. सुविधांचा उपयोग निर्बंधांना अनुसरूनच करावा.

पाहुण्यांसाठी हॉटेल उघडी
पाहुण्यांना प्रवेशासाठी सर्व स्तरांच्या हॉटेलांना उघडे ठेवण्याची परवानगी असेल. तरीही वेगवेगळ्या स्तरातून येणाऱ्या पाहुण्यांच्या निर्बंधांबद्दल अंकुश ठेवण्याची जबाबदारी आस्थापनेवर असेल.  

 पर्यटन स्थळे 
प्रशासन कोणत्याही प्रतिष्ठित पर्यटन स्थळांना वेगळे प्रशासकीय घटक म्हणून घोषित करू शकतात. यासाठी पॉझिटिव्हिटी रेट किंवा भरलेले ऑक्सिजन बेड हे निकष नसतील. या पर्यटन स्थळांच्या परिसरातील सर्व हॉटेलांसाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू असतील. जर हे पर्यटनस्थळ स्तर पाचमध्ये असेल तर ई-पासशिवाय कोणत्याही अभ्यागतांना तेथे येण्याची परवानगी नसेल. पाहुणे स्तर पाचमधील असतील तर त्यांना एक आठवड्यासाठी विलगीकरणात राहावे लागेल.

 

 

Web Title: Restrictions that will be in place in the state from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.