विधि अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 06:02 AM2018-05-18T06:02:49+5:302018-05-18T06:02:49+5:30

मुंबई विद्यापीठाच्या विधि अभ्यासक्रमाचे रखडलेले निकाल मुंबई विद्यापीठ जाहीर करत असले तरी दुसरीकडे परीक्षा विभागाच्या तारखांचा गोंधळ कायम आहे.

Result of the Law Syllabus | विधि अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर

विधि अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या विधि अभ्यासक्रमाचे रखडलेले निकाल मुंबई विद्यापीठ जाहीर करत असले तरी दुसरीकडे परीक्षा विभागाच्या तारखांचा गोंधळ कायम आहे. नुकत्याच विद्यापीठाने विधि शाखेच्या बारा परीक्षा पुढे ढकलल्या, मात्र, त्यातील शेवटचा पेपर आणि एलएलएमची प्रवेश प्रक्रिया एकाच दिवशी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे.
निकालाच्या गोंधळामुळे तीन वर्षे आणि पाच वर्षे अभ्यासक्रमाच्या बारा परीक्षा मुंबई विद्यापीठाने नुकत्याच पुढे ढकलल्या. या परीक्षा २२ मे ऐवजी आता ३० मेपासून सुरू होतील. मात्र त्यातील शेवटचा पेपर (लॉ रिलेटिंग टू वुमन अँड चिल्ड्रेन ) हा एलएलएमच्या प्रवेश प्रक्रियेच्या दिवशीच येत आहे. यामुळे विधि अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षीच्या ज्या विद्यार्थ्यांना ही प्रवेशप्रक्रिया द्यायची आहे त्यांची अडचण होईल. परीक्षेची वेळ वेगळी असली तरी विद्यार्थ्यांना मनस्ताप होईल. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी स्टुडण्ट लॉ कौन्सिलने केल्याचे कौन्सिलचे सचिन पवार यांनी सांगितले.
>अखेर विद्यापीठाने सर्व निकाल लावले
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या विधि अभ्यासक्रमाचे स्हिवाळी सत्राचे सगळे निकाल विद्यापीठाकडून जाहीर झाले आहेत. गुरुवारी मुंबई विद्यापीठाने पाच वर्षे अभ्यासक्रमाच्या (एलएलबी-बीएसएल) तिसऱ्या, नवव्या आणि पाचव्या सत्राच्या परीक्षांचे निकाल विद्याापीठाने जाहीर केले आहेत. या तिन्ही अभ्यासक्रमांमध्ये उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांची टक्केवारी अनुक्रमे ४३.२४% , ५६.३९% आणि ४७.११%
अशी आहे.

Web Title: Result of the Law Syllabus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.