Join us

विधी अभ्यासक्रमांचा निकाल दहा दिवसांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 5:36 AM

विधी (लॉ) अभ्यासक्रमाचे रखडलेले निकाल लवकरच लागतील, अशी अपेक्षा आहे. विधि शाखेच्या विविध प्रश्नांसंदर्भात बुधवारी कलिना कॅम्पस येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मुंबई विद्यापीठाने विधी अभ्यासक्रमाच्या रखडलेल्या २३,०७६ पेपर तपासणीचे काम युद्धपातळीवर करून येत्या दहा दिवसांत निकाल जाहीर करण्यात येईल, असे जाहीर केले.

मुंबई : विधी (लॉ) अभ्यासक्रमाचे रखडलेले निकाल लवकरच लागतील, अशी अपेक्षा आहे. विधि शाखेच्या विविध प्रश्नांसंदर्भात बुधवारी कलिना कॅम्पस येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मुंबई विद्यापीठाने विधी अभ्यासक्रमाच्या रखडलेल्या २३,०७६ पेपर तपासणीचे काम युद्धपातळीवर करून येत्या दहा दिवसांत निकाल जाहीर करण्यात येईल, असे जाहीर केले.मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाला विधी (लॉ) अभ्यासक्रमांच्या निकालाचा कठीण पेपर अद्याप सोडवता आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी प्रचंड तणावाखाली आहेत. या प्रकरणी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत विद्यापीठाविरोधात आंदोलनाचे अस्त्र उगारले होते. तर काही विद्यार्थी संघटनांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. याची गंभीर दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने विधि शाखेसंदर्भातील प्रश्नांबाबत एका विशेष बैठकीचे आयोजन बुधवारी कलिना कॅम्पस येथे केले होते. या बैठकीला मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे, विधि विभागाचे प्रमुख डॉ. अश्विनी ओझा, प्रभारी कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे, स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार तसेच विधि शाखेच्या विद्यार्थी प्रतिनिधींबरोबरच प्राध्यापक आणि विद्यापीठाचे अनेक प्रशासकीय अधिकारीदेखील उपस्थित होते. या बैठकीत विधी अभ्यासक्रमाचे रखडलेले २३,०७६ पेपर तपासणीचे काम पूर्ण करून येत्या १० दिवसांत निकाल लावण्याचे आश्वासन विद्यापीठाने दिल्याची माहिती पवार यांनी दिली. सोबतच सर्व निकाल जाहीर झाल्यानंतरच पुढील सहामाही परीक्षा घेण्यात याव्यात, ही विद्यार्थ्यांची मागणीही विद्यापीठ प्रशासनाने मान्य केली.केवळ निकाल वेळेवर न मिळाल्याने पुनर्मूल्यांकनात पास होऊनही विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र यापुढे असा प्रकार घडणार नसल्याची कबुली विद्यापीठ प्रशासनाकडून बैठकीत देण्यात आली.पेपर तपासणीच्या कामासाठी प्राध्यापक मिळत नसल्याची तक्रार समोर आली असून त्यावर उत्तर म्हणून बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या ज्या वकिलांना पाच वर्षांचा अनुभव आहे, अशांची निकालाच्या कामासाठी मदत घेण्याबाबत विचार सुरू आहे. गेल्यावर्षी निकाल गोंधळ समोर आल्यानंतर त्यावेळीही अशाप्रकारची मदत घेण्यात आली होती. त्याचधर्तीवर यंदाही हा प्रयोग राबविण्यात येणार असल्याचे कळते.>विद्यार्थ्यांना दिलासालॉच्या सेमिस्टर २, ४, ६च्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच ठेवून या परीक्षांनंतर काही दिवसांनी १, ३, ५ सेमिस्टरच्या एटी / केटी परीक्षा घ्याव्यात, या विद्यार्थ्यांच्या पर्यायावर विद्यापीठ प्रशासनाने मान्यता दर्शवल्याचे पवार यांनी सांगितले. यामुळे केटीच्या तयारीसाठी तसेच पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज पाठवण्यास वेळ मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.>विद्यार्थ्याचा आत्मदहनाचा इशाराअभिषेक सावंत या विद्यार्थ्याने डिसेंबरमध्ये विधी अभ्यासक्रमाच्या सेमिस्टर ५च्या एटीकेटीची परीक्षा दिली असून, १२० दिवस झाले तरी अद्याप निकालजाहीर झालेला नाही. त्यामुळे एलएलएम अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल का, याबाबत साशंकता आहे. निकालासाठी आंदोलन आणि पत्रव्यवहार केल्यानंतरही पदरी निराशा आल्याने अखेर विद्यापीठाच्या या निकाल गोंधळाविरोधात त्याने १४ एप्रिल २०१८ रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी विद्यापीठाच्या आवारात आत्मदहन करण्याचे ठरवले आहे.विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अभिषेकने हा इशारा दिला आहे. त्याला यासंदर्भात स्थानिक पोलीस स्टेशनकडून १४९ची नोटीस पाठविण्यात आली आहे. मात्र काहीही झाले तरी न्यायासाठी आत्मदहन करणारच, असे त्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :विद्यापीठ