लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर झाला. राज्य परिषदेने २६ फेब्रुवारी राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली होती. पाचवी आणि आठवीच्या या परीक्षेत राज्यभरातून एकूण ९ लाख १७ हजार ५३४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यात पाचवीच्या ५ लाख २६ हजार ६३५ विद्यार्थ्यांचा तर आठवीतून ३ लाख ९० हजार ८९९ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यात एकूण १ लाख ६५ हजार ५८९ विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले असून त्यातील केवळ ३० हजार ६३ विद्यार्थ्यांच शिष्यवृत्ती मिळणार आहे.इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा तात्पुरता निकाल १७ मे रोजी जाहीर केला होता. त्यानंतर गुण पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर आता मंगळवारी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या नंतर गुणवत्ता यादी परिषदेतर्फे जाहीर करण्यात आली. यानुसार पाचवीच्या स्कॉलरशीपसाठी एकूण १६ हजार ३०८ विद्यार्थी तर आठवीसाठी १३ हजार ७५५ विद्यार्थी पात्र ठरले. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी ६६६.े२ूीस्र४ल्ली.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर
By admin | Published: June 28, 2017 3:36 AM