अंतर्गत गुणांवर शालेय व्यवस्थापन पदविकाचा निकाल घोषित करावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 07:09 PM2020-06-26T19:09:33+5:302020-06-26T19:09:52+5:30

मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे शिक्षकांची मागणी

The result of school management diploma should be declared on internal marks | अंतर्गत गुणांवर शालेय व्यवस्थापन पदविकाचा निकाल घोषित करावा

अंतर्गत गुणांवर शालेय व्यवस्थापन पदविकाचा निकाल घोषित करावा

Next

 
मुंबई : डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट (शालेय व्यवस्थापन पदविका) चा निकाल अंतर्गत गुणांच्या आधारे घोषित करावा अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली आहे. याबाबत अनेक शिक्षकांनी तर पत्रे लिहिली आहेतच शिवाय आमदार निरंजन डावखरे यांनी कुलगुरूंना २४ जून रोजी पत्र पाठवून ही मागणी केली आहे

शाळेचे व्यवस्थापन सुरळीत चालविण्यासाठी व्यवस्थापनाचे शास्त्र अवगत करावे लागते. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने याचा विचार करून १९९३ साली राज्यातील माध्यमिक शाळा प्रमुखांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाची गरज भागविण्याच्या दृष्टिने विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेचा 'शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम' तयार केला आता ह्या शिक्षणक्रमाला शासनाची मान्यता व होऊ घातलेल्या मुख्याध्यापकांसाठी अनिवार्यता प्राप्त झाल्याने अनेक शिक्षक या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात.या अभ्यासक्रमात शैक्षणिक व्यवस्थापन, कार्यालयीन व्यवस्थापन, शालेय आर्थिक व्यवस्थापन, शाळेची रचना व भौतिक सुविधा, विद्यार्थी गुणवत्ता विकास व कृतीसंशोधन आराखडा असे विषय शिकविले जातात. व अंतर्गत कामांसाठी गुण दिले जातात.

मे महिन्यात या अभ्यासक्रमाची परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवर होत असते. परंतू कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाऊन असल्याने परीक्षा होतील की नाही याबाबत साशंकता आहे त्यातच १५ जून पासून शिक्षकांना शाळेची कामे करावी लागत आहे त्यामुळे अंतर्गत गुणांच्या आधारे अभ्यासक्रमाचा निकाल घोषित करावा अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. वर्षभर या अभ्यासक्रमाचा अभ्यास शिक्षकांनी केला आहे तसेच अंतर्गत कामे केली असल्याने परीक्षांचे आयोजन करणे विद्यापीठाला शक्य नसल्यास अंतर्गत गुणांच्या आधारे निकाल घोषित करावा अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली असल्याचे भाजपा शिक्षक सेलचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.

Web Title: The result of school management diploma should be declared on internal marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.