Join us  

ठाणे जिल्ह्याचा निकाल ८९.७५ टक्के

By admin | Published: June 18, 2014 2:57 AM

दहावीच्या मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात ठाणे जिल्ह्याचा निकाल ८९.७५ टक्के लागला आहे. यंदा देखील मुलींनीच जिल्ह्यात बाजी मारली आहे

ठाणे : दहावीच्या मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात ठाणे जिल्ह्याचा निकाल ८९.७५ टक्के लागला आहे. यंदा देखील मुलींनीच जिल्ह्यात बाजी मारली आहे. जिल्ह्यातून १ लाख ४८ हजार ९२३ विद्यार्थी शालांत परीक्षेस बसले होते. त्यापैकी १ लाख ३३ हजार ६५४ विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. शालांत परीक्षा विशेष श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या ३३ हजार ९१० आहे. तर प्रथम श्रेणीत ४५ हजार ३८४, द्वितीय श्रेणीत ४२ हजार ७६९ तर ११ हजार ५९१ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शालांत परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलांची टक्केवारी ८८.०४ टक्के तर मुलींची टक्केवारी ९१. ७३ टक्के आहे. ठाणे जिल्ह्यात शालांत परिक्षेस ८० हजार १७९ मुले बसली होती. पैकी ७५ हजार ५९२ मुले उत्तीर्ण झाली आहेत. शालांत परिक्षेस ६८ हजार ७४४ मुली बसल्या होत्या. त्यापैकी ६३ हजार ६२ मुली शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. तर १४ हजार ६३१ विद्यार्थी पुन:परीक्षार्थी होते. त्यामध्ये ३ हजार ७०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण २५.३४ टक्के आहे. (प्रतिनिधी)