तृतीय वर्ष बीए सत्र सहाचा निकाल ९४.७० टक्के, आजपर्यंत ८७ परीक्षेचे निकाल जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 01:57 AM2020-11-03T01:57:23+5:302020-11-03T01:57:44+5:30

Mumbai University : तृतीय वर्ष बीए सत्र ६ या परीक्षेत एकूण ९ हजार ७८२ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.

The result of third year BA session six is 94.70 percent, till today the results of 87 exams have been declared | तृतीय वर्ष बीए सत्र सहाचा निकाल ९४.७० टक्के, आजपर्यंत ८७ परीक्षेचे निकाल जाहीर

तृतीय वर्ष बीए सत्र सहाचा निकाल ९४.७० टक्के, आजपर्यंत ८७ परीक्षेचे निकाल जाहीर

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२०च्या अंतिम वर्ष/ सत्राच्या नियमित परीक्षेतील तृतीय वर्ष बीए, बीएस्सी व बीएमएस सत्र ६ या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला. आजपर्यंत विद्यापीठाने ८७ परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. आज विद्यापीठाने १३ परीक्षांचे निकाल जाहीर केले. तृतीय वर्ष बीए सत्र ६ या परीक्षेचा निकाल ९४.७० टक्के लागला.
तृतीय वर्ष बीए सत्र ६ या परीक्षेत एकूण ९ हजार ७८२ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले. या परीक्षेला १३ हजार ६३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १३ हजार ५३७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. तर १०० विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच ५४७ विद्यार्थी हे परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत. तृतीय वर्ष बीएस्सी सत्र ६ या परीक्षेचा निकाल ९७.८५ टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण ८,०२५ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले. 
तृतीय वर्ष बीएमएस सत्र ६ या परीक्षेचा निकाल ९७.५८ टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण १३ हजार १६६ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले. या परीक्षेला १५ हजार ७५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १५ हजार ७०७ परीक्षेस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. ४४ विद्यार्थी अनुपस्थित होते. 

Web Title: The result of third year BA session six is 94.70 percent, till today the results of 87 exams have been declared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.