Join us  

पश्चिम उपनगरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम

By admin | Published: January 19, 2016 2:30 AM

वैतरणा जलवाहिन्यांवर सहार अँकर ब्लॉक ते स्काडा केबिन वांद्रेदरम्यान दोन ठिकाणी प्लेट बसविण्याचे आणि अप्पर वैतरणा जलवाहिनीवरील गळती थांबविण्याचे काम

मुंबई : वैतरणा जलवाहिन्यांवर सहार अँकर ब्लॉक ते स्काडा केबिन वांद्रेदरम्यान दोन ठिकाणी प्लेट बसविण्याचे आणि अप्पर वैतरणा जलवाहिनीवरील गळती थांबविण्याचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात येणार आहे. १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणारे हे काम २१ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता पूर्ण होईल. या कालावधीत सांताक्रूझ पूर्व, खार रोड (पूर्व) आणि वांद्रे (पूर्व) आणि धारावी परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल. परिणामी नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.१९ जानेवारी रोजी सांताकू्रझ (पूर्व), खार रोड (पूर्व), वांद्रे (पूर्व) परिसरात नेहमीच्या वेळेवर पाणीपुरवठा होईल. वांद्रे टर्मिनस, खेरवाडी रेल्वे वसाहतीमध्ये सकाळी ११ वाजल्यानंतर पाणीपुरवठा होणार नाही. धारावीत पहाटे ४ ते सकाळी १० या वेळेत ९० फुटी रस्ता, संत रोहिदास मार्ग, लूप मार्ग, शास्त्री नगर, ९० फुटी रस्ता, शाहू नगर, जास्मिन मिल मार्ग, टी.एच. कटारिया मार्ग, ट्रान्झिस्ट कॅम्प, संत कक्कया मार्ग, शीव-माहीम जोडरस्ता, प्रेमनगर, शताब्दी नगर, नाईक नगर, खामदेव नगर, एम. जी. मार्ग, आंध्रा व्हॅली या भागात पाणीपुरवठा सुरळीत होईल. तर सायंकाळी ४ ते रात्री ९ या काळात धारावी मुख्य रस्ता, गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा या परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.२० जानेवारी रोजी सांताक्रूझ (पूर्व), खार रोड (पूर्व), वांद्रे (पूर्व) येथे पाणी येणार नाही. वांद्रे टर्मिनस, खेरवाडी रेल्वे वसाहतीसह धारावीमध्ये पहाटे ४ ते सकाळी १० या वेळेत ९० फुटी रस्ता, संत रोहिदास मार्ग, लूप मार्ग, शास्त्री नगर, ९० फुटी रस्ता, शाहू नगर, जास्मिन मिल मार्ग, टी.एच. कटारिया मार्ग, ट्रान्झिस्ट कॅम्प, संत कक्कया मार्ग, शीव-माहीम जोडरस्ता, प्रेमनगर, शताब्दी नगर, नाईक नगर, खामदेव नगर, एम. जी. मार्ग, आंध्रा व्हॅली या भागात पाणीपुरवठा होणार नाही. तर सायंकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत धारावीतील धारावी मुख्य रस्ता, गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा या भागात उशिराने पाणी येईल. २१ जानेवारी रोजी सांताक्रूझ (पूर्व), खार रोड (पूर्व), वांद्रे (पूर्व) येथे नेहमीच्या वेळेवर पाणी येईल. वांद्रे टर्मिनस, खेरवाडी रेल्वे वसाहतमध्ये पहाटे ४ वाजल्यानंतर पाणी येईल. धारावीमध्ये पहाटे ४ ते सकाळी १० या वेळेत ९० फुटी रस्ता, संत रोहिदास मार्ग, लूप मार्ग, शास्त्री नगर, ९० फुटी रस्ता, शाहू नगर, जास्मिन मिल मार्ग, टी.एच. कटारिया मार्ग, ट्रान्झिस्ट कॅम्प, संत कक्कया मार्ग, शीव-माहीम जोडरस्ता, प्रेमनगर, शताब्दी नगर, नाईक नगर, खामदेव नगर, एम. जी. मार्ग, आंध्रा व्हॅलीमध्ये नेहमीच्या वेळेवर पाणीपुरवठा होईल. तर धारावी मुख्य रस्ता, गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाड्यात नेहमीच्या वेळेत पाणी येईल. (प्रतिनिधी)