मुंबईतील ३३१ शाळांचा १०० टक्के लागला निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 02:55 AM2019-06-09T02:55:53+5:302019-06-09T02:56:20+5:30

मागील वर्षीच्या तुलनेत घसरण : महापालिका शाळांचा निकाल ५३.१४ टक्के

Results of 100% of 331 schools in Mumbai resulted | मुंबईतील ३३१ शाळांचा १०० टक्के लागला निकाल

मुंबईतील ३३१ शाळांचा १०० टक्के लागला निकाल

Next

मुंबई : दहावीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशावर त्याच्या शाळेचे यशही अवलंबून असते. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी मुंबईतील एकूण ३७३४ शाळांमधून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी मुंबईतील यंदा ३३१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मागील वर्षीपेक्षा हे प्रमाण निम्म्यावर घसरले असून मागील वर्षी हा आकडा ८१६ इतका होता.

तर मुंबई महापालिकेच्या ४९ अनुदानित, १६१ विनाअनुदानित अशा २१० माध्यमिक शाळांतून दहावीकरिता बसलेल्या १३ हजार ५६३ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार २०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मुंबई महापालिकेच्या शाळांचा दहावीचा निकाल ५३.१४ टक्के लागला आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून, ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाºया विद्यार्थ्यांची संख्या १२ आहे.
गुरू गोविंद सिंग मार्ग मनपा माध्यमिक शाळेतील जैसवार राज महेंद्रप्रसाद या विद्यार्थ्याने ९३.२० टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकाविला आहे. एम. एन. जोशी पब्लिक स्कूलच्या पूजा संदीप कनोजियाने ९२.६० टक्के गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकाविला आहे. ग्लोब मिल पॅसेज मनपा शाळेतील मल्लिका आनंद अरतुला हिने ९२.४० टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकाविला आहे. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांमध्ये १२ विद्यार्थ्यांचा समावेश असून, यामध्ये जैसवार राज महेंद्रप्रसाद ९३.२० टक्के, पूजा संदीप कनोजिया ९२.६०, मल्लिका आनंद अरतुला ९२.४०, साक्षी हनुमंत चौधरी ९१.८०, वैष्णवी अनंत घोलप ९१.६०, आदिती संभाजी ठाकूर ९१.४०, शिवानीदेवी अरुण तिवारी ९०.४०, प्राची शांतीलाल चौहान ९०.४०, नेहा मनोहर मुळे ९०.४०, ज्योती सुतार ९०.२०, मोहम्मद झीशन राजा ९० आणि मासुम राजा अबू खालिक खान ९० या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दहावीच्या परीक्षेत ८५ पेक्षा अधिक टक्के मिळविणाºया १३ शाळा आहेत़

पेढे खाल्ल्याने ६ जणांना विषबाधा
ठाणे : दहावीच्या परीक्षेत ५६ टक्के गुण मिळाल्याच्या आनंदात आणलेले पेढे खाल्ल्याने सहा जणांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. सर्वांना रामचंद्रनगरमधील खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. उमेश गौतम यांनी दिली. दहावी उत्तीर्ण झालेल्या दुर्गानंद नंदकुमार सदगीर हिलाही उलट्या, जुलाबाच्या त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल केले.
 

Web Title: Results of 100% of 331 schools in Mumbai resulted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.