डोंबिवलीतील १२ शाळांचा निकाल १०० टक्के

By admin | Published: June 18, 2014 03:01 AM2014-06-18T03:01:33+5:302014-06-18T03:01:33+5:30

दुपारी १ वा. वेबसाईटवर निकाल जाहीर झाल्यानंतर त्यावर निकाल पाहण्याची विद्यार्थ्यांची झुंबड उडाल्याचे दृश्य सायबर कॅफेत दिसले

Results of 12 schools in Dombivli, 100% | डोंबिवलीतील १२ शाळांचा निकाल १०० टक्के

डोंबिवलीतील १२ शाळांचा निकाल १०० टक्के

Next

कल्याण: मंगळवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात ९० टक्क्यांपेक्षा अधिक निकाल लागण्याची स्पर्धा कल्याण-डोंबिवलीत पाहायला मिळाली असून, डोंबिवलीतील १२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. यात रोटरी कर्णबधीर शाळेचा समावेश आहे. त्यांनी १०० टक्के निकालाची परंपरा यंदा कायम राखली आहे.
दुपारी १ वा. वेबसाईटवर निकाल जाहीर झाल्यानंतर त्यावर निकाल पाहण्याची विद्यार्थ्यांची झुंबड उडाल्याचे दृश्य सायबर कॅफेत दिसले. मोबाईलवरही सहज निकाल उपलब्ध झाला. डोंबिवली शहराचा आढावा घेता १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये सिस्टर निवेदिता, चंद्रकांत पाटकर, शिवाई बालक मंदिर, एस.के. पाटील, मॉडेल स्कूल, होली एंजल्स, वेलंकिनी, सेंट टेरेसा आदींचा समावेश आहे.
यातील बहुतांश शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. रोटरी कर्णबधीर शाळेत एकूण १७ विद्यार्थी बसले होते सर्वजण उत्तीर्ण झाले. टिळकनगर शाळेतील नेत्रा प्रभू या विद्यार्थिनीला संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळाल. पाटकर शाळेतील प्रणव पवारला संस्कृत आणि विज्ञान विषयात प्रत्येकी ९९ गुण मिळाले. कल्याण के.सी.विद्यालयातील १० पेक्षा अधिक विद्यार्थी ९५ आणि ९४ टक्क्यांदरम्यान उत्तीर्ण झाले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Results of 12 schools in Dombivli, 100%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.