Join us

निकालाची ऐशीतैशी! २३०० विद्यार्थ्यांना सरासरी गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 2:57 AM

मुंबई विद्यापीठाने यंदा चार महिने उशीरा म्हणजे १९ सप्टेंबरला निकाल जाहीर केल्यानंतर विद्यापीठाने निश्वास सोडला. पण, आॅक्टोबर महिना उजाडूनही निकालाचा गोंधळ अजून संपलेला नाही.

मुंबई : मुंबई विद्यापीठाने यंदा चार महिने उशीरा म्हणजे १९ सप्टेंबरला निकाल जाहीर केल्यानंतर विद्यापीठाने निश्वास सोडला. पण, आॅक्टोबर महिना उजाडूनही निकालाचा गोंधळ अजून संपलेला नाही. कारण, आधी १ हजार ६०० विद्यार्थ्यांना सरासरी गुण देणार होते. आता मात्र २ हजार ३०० विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका मिळत नसल्याने आता एकूण ३ हजार ७०० विद्यार्थ्यांना सरासरी गुण मिळणार आहेत. सरासरी गुण देण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापमन मंडळाचे संचालक अर्जुन घाटुळे यांनी दिली.मार्च-एप्रिल महिन्यांत विद्यापीठाच्या झालेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाईन पद्धतीने करण्यात आली. निकालजाहिरझाले पण, स्कॅनिंग करताना अथवा गठ्ठ्यात अदलाबदल झाल्याने निकाल जाहीर केल्यावर उत्तरपत्रिकांची सरमिसळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता विद्यापीठाची चिंता अजून वाढली आहे. या गोंधळाला कंटाळून विधी अभ्यासक्रमाच्याएका विद्यार्थ्याने आज परीक्षा भवनाच्या समोरच उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला.आज परीक्षा भवनासमोर अमेय मालशे या विद्यार्थ्यासह अनेक विद्यार्थी त्यांच्या पालकांबरोबर हजर झाले होते. यावेळी विद्यापीठाच्या पदाधिकाºयांनी चर्चा केली. आणि पुढील सहा दिवसांत निकाल जाहीर करु असे तोंडी आश्वासन दिले. लेखी आश्वासन मिळालेले नाही. पण, तरीही विद्यापीठ सहा दिवसात निकाल जाहीर करेल, यावर विश्वास ठेऊन अमेयने उपोषण सोडले.डॉ. अर्जुन घाटुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या निकालाच्या नव्या संकेतस्थळावर निकालांविषयी माहिती मिळणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात येणार आहे. त्यांची एक यादी देखील या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.रखडलेल्या निकालासंदर्भात अधिक माहिती देताना घाटुळे म्हणाले की, सध्या एकूण २३०० विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात येणार आहेत. त्यांची विभागवार माहिती लवकरच संकेतस्थळावर जाहीर होईल. त्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झालेल्या नसून त्यांची सरमिसळ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सरासरी गुणांसाठी परीक्षा मंडळाची मान्यता देखील मिळाली आहे.

टॅग्स :मुंबई विद्यापीठविद्यार्थी