Join us

‘त्या’ तरुणीवरील कारवाईचा फेरविचार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 4:02 AM

‘फ्री काश्मीर’चे पोस्टर गेट वे ऑफ इंडियावरील आंदोलनात झळकविणारी तरुणी मेहेर मिर्झा प्रभू हिच्यावरील पोलीस कारवाई मागे घेण्यासंदर्भात फेरविचार केला जाईल,

मुंबई : ‘फ्री काश्मीर’चे पोस्टर गेट वे ऑफ इंडियावरील आंदोलनात झळकविणारी तरुणी मेहेर मिर्झा प्रभू हिच्यावरील पोलीस कारवाई मागे घेण्यासंदर्भात फेरविचार केला जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी येथे पत्रकारांना सांगितले.ते म्हणाले की, मेहेरने पोलिसांना जे बयान दिले आहे त्यावरून तिचा उद्देश राष्ट्रद्रोहाचा नव्हता. काश्मीरमध्ये अजूनही मोबाईल, इंटरनेट सेवा सुरळीत नाही. नेत्यांना नजरकैदेत ठेवले आहे. या परिस्थितीपासून काश्मीर मुक्त करावा, या भूमिकेतून ‘फ्री काश्मीर’चा फलक झळकावला, असे तिचे म्हणणे आहे. सर्व माहिती घेऊन कारवाई संदर्भात फेरविचार केला जाईल.गेट वे वरुन आंदोलकांना हुसकावण्याचा वा अटक करण्याचा हेतू नव्हता. सुरक्षित जागा म्हणून आझाद मैदानाचा पर्याय देण्यात आला, असेही देशमुख म्हणाले.कोरेगाव भीमा प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मी लवकरच बैठक घेईल आणि विस्तृत आढावा घेऊनच सरकारची भूमिका मांडेल. आधीच्या सरकारच्या भूमिकेविरुद्ध वेगळी मते मांडली म्हणून कोणाला शहरी नक्षलवादी म्हणणे योग्य ठरणार नाही असेही देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :जेएनयू