फोटो फॉरवर्ड केला म्हणून निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 07:36 PM2020-09-11T19:36:16+5:302020-09-11T19:39:10+5:30
भाजपाच्या सोशल मीडिया सेलच्या महिला अध्यक्षा प्रीती गांधी यांनीही आपल्या ट्विटरवरुन यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर करताना शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच, या खराब वातावरणामुळे मन व्यथित झाल्याचंही त्यांनी म्हटंलय.
मुंबई - कंगना आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेला असतानाच शिवसैनिकांनी एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कांदिवली येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांनीच स्वत; तक्रार दिली आहे. त्यानंतर, भादंवि अनुसार 325, 143, 147, 149 अन्वये मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मारहाणीचा व्हिडिओ शेअर केला आहे.
''एका महिलेवर ताकद आजमावल्यानंतर उद्धव यांचे कार्टून व्हाट्सएप वर फॉरवर्ड केले म्हणून शिवसैनिकांनी घरात घुसून मदन शर्मा या माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली, त्यांचा डोळा फोडला. याप्रकरणी FIR दाखल करण्यात आला असला तरी सत्तापिसाटांचा हा माज उतरवण्याची वेळ आली आहे असेच म्हणावे लागेल. देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी आयुष्यातील काही वर्षे खर्ची घातली असे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना भुरट्या शिवसैनिकांनी केलेली मारहाण पक्षाची मानसिकता दाखवणारी आहे. जे घराबाहेर पडण्याची हिंमत दाखवून शकले नाहीत त्यांचे चेले वृद्धाना ताकद दाखवतायत.'', असे भातखळकर यांनी म्हटलं आहे. फिर्यादी मदन शर्मा यांच्या तक्रारीवरुन आरोपी कमलेश कदम व त्याच्या 8 ते 10 साथीदारांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंगना के बाद वृद्ध निवर्तमान नौसेना अधिकारी को किया गया लक्ष्य...
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 11, 2020
मदन शर्मा नाम के बुजुर्ग नौसेना अधिकारी को मारपीट करने के बाद गुंडई करने वाले चिल्लर शिवसैनिकों के खिलाफ पुलिस ने FIR दाखिल किया है। pic.twitter.com/Lr3D79eTMB
अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरुन एफआयआरची कॉपी आणि मारहाणीचा व्हिडिओही शेअर केला आहे.
अभिनेत्री कंगना राणावत के कार्यालय की तोड़फोड़ करके अपनी मर्दानगी दिखाने वाले सत्ताधारी शिवसेना ने अब सत्ता के मद में एक बुजुर्ग भूतपूर्व नौसेना अधिकारी मदन शर्मा को मारपीट करते हुए उनकी आंख को जबरदस्त चोट पहुंचाई है। मुख्यमंत्री घरबैठे तानाशाही चला रहे है। pic.twitter.com/qF2NVcIN55
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 11, 2020
देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी आयुष्यातील काही वर्षे खर्ची घातली असे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना भुरट्या शिवसैनिकांनी केलेली मारहाण पक्षाची मानसिकता दाखवणारी आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 11, 2020
जे घराबाहेर पडण्याची हिंमत दाखवून शकले नाहीत त्यांचे चेले वृद्धाना ताकद दाखवतायत. pic.twitter.com/OyDPPuB4dD
भाजपाच्या सोशल मीडिया सेलच्या महिला अध्यक्षा प्रीती गांधी यांनीही आपल्या ट्विटरवरुन यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर करताना शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच, या खराब वातावरणामुळे मन व्यथित झाल्याचंही त्यांनी म्हटंलय.
62yr old Ex-Navy officer Madan Sharma badly beaten by @ShivSena workers for forwarding a cartoon on whatsapp. After much persistence an FIR has been filed at Kandivali police station, Mumbai. Mumbaikars extremely upset with the vicious atmosphere that is being created. निषेध!! pic.twitter.com/3eJaBLvLUb
— Priti Gandhi - प्रीति गांधी (@MrsGandhi) September 11, 2020
कंगना vs शिवसेना वाद
मुंबईत सुरू असलेल्या कंगना राणौत आणि शिवसेनेमधील वादाचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. कंगनाच्या मुंबईतील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगरपालिकेने करवाई केल्यानंतर आता कंगनाविरोधात ड्र्ग्स केसची चौकशीही होणार आहे. याच दरम्यान या प्रकरणी आता विश्व हिंदू परिषदेनं कंगनाची बाजू घेतली आहे. अयोध्येतील संतांनी कंगनाचं समर्थन केलं असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येऊ नये. यापुढे अयोध्येत उद्धव ठाकरेंचं स्वागत नाही तर तीव्र विरोध होणार" असल्याचं म्हटलं आहे.