वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे

By admin | Published: August 5, 2015 02:13 AM2015-08-05T02:13:24+5:302015-08-05T02:13:24+5:30

सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८वरून ६० वर्षे करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला

Retirement age for medical officers is 60 years | वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे

Next

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८वरून ६० वर्षे करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचा लाभ आरोग्य सेवा संचालनालय आणि राज्य कामगार विमा योजनेतील गट ‘अ’च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळेल. पदव्युत्तर पदविका व पदवीधारक अधिकाऱ्यांना अनुक्रमे तीन व सहा प्रोत्साहनात्मक वेतनवाढी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
वैद्यकीय शिक्षण विभागातील प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीचे वय ६४ वर्षांपर्यंत वाढविण्याचा निर्णय
५ मार्च २०१५ रोजी सरकारने घेतला होता. हे प्राध्यापक आणि आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची शैक्षणिक अर्हता जवळपास सारखी असताना त्यांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ५८वरून ६० करण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Retirement age for medical officers is 60 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.