राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय आता ६२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 07:08 AM2019-11-28T07:08:24+5:302019-11-28T07:08:38+5:30

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राज्य कामगार विमा योजनेंतर्गत हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्यात आले होते.

 The retirement age of medical officers in the state is now 5 | राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय आता ६२

राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय आता ६२

Next

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राज्य कामगार विमा योजनेंतर्गत हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्यात आले होते. मात्र आता मंगळवारी सार्वजनिक आरोग्य विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ करण्यात आले.
आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाºयांच्या निवृत्तीचे वय ६० वरून ६२ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह राज्य कामगार विमा योजनेतील वैद्यकीय अधिकाºयांना आता आणखी दोन वर्षे सेवेत राहण्याची संधी मिळणार असून, रिक्त जागांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. आरोग्य सेवा संचालनालयातील महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व आरोग्य सेवा गट ‘अ’ मधील संचालक, अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालक; तसेच जिल्हा आरोग्य अधिकाºयांच्या कार्यालयाचा तसेच कामगार विमा योजनेतील संचालक, उपसंचालक, वैद्यकीय अधीक्षक यांना वगळून उर्वरित रुग्णालयात थेट सेवा देणाºया वैद्यकीय अधिकाºयांना दोन वर्षांच्या मुदतवाढीचा फायदा होईल.
दरम्यान, वैद्यकीय अधिकाºयांच्या कमतरतेमुळे आरोग्य सेवा संचालनालयातील महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ‘अ’मधील वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, विशेषज्ञ संवर्गातील पदे, वरिष्ठ अधिकाºयांची पदे, राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट ‘अ’मधील वैद्यकीय अधिकाºयांच्या सेवा निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षांपर्यंत वाढविण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला आहे. हा निर्णय पुढील पाच वर्षांसाठी अर्थात २०२३ पर्यंत लागू केला आहे.
निवृत्तीमुळे रिक्त पदांमध्ये वाढ होऊन आरोग्यव्यवस्थेची दुरवस्था होऊ शकते. हे टाळण्यासाठी वैद्यकीय अधिकाºयांसह वरिष्ठ अधिकाºयांच्या सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षांपर्यंत वाढविण्यात आले आहे. या खात्यात वरिष्ठ अधिकाºयांच्या निवृत्तीचे वय ६० वर्षे होत असल्याने वयाने नंतरच्या फळीतील वैद्यकीय अधिकारी वर्गातील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक वर्गातील अधिकाºयांना पदोन्नतीची संधी मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आरोग्य खात्यात निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title:  The retirement age of medical officers in the state is now 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार