सामाजिक न्याय दिनी महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार वापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:06 AM2021-06-27T04:06:13+5:302021-06-27T04:06:13+5:30

मुंबई : वर्धा, गडचिरोलीत दारूबंदी आहे. चंद्रपूरची दारूबंदी उठविण्यात आली आहे. परिणामी सरकारच्या विरोधात शासनाचे महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार ...

Return of Mahatma Gandhi De-addiction Award on Social Justice Day | सामाजिक न्याय दिनी महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार वापसी

सामाजिक न्याय दिनी महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार वापसी

Next

मुंबई : वर्धा, गडचिरोलीत दारूबंदी आहे. चंद्रपूरची दारूबंदी उठविण्यात आली आहे. परिणामी सरकारच्या विरोधात शासनाचे महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार परत करण्याचे आवाहन व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाच्या वतीने करण्यात आले होते. राज्यभरातील व्यसनमुक्ती पुरस्कारप्राप्त कार्यकर्त्यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. डॉ. अजित मगदुम, हरिश्चंद्र कृष्णाजी पाल, डॉ. सूर्यप्रकाश गभणे, वीरेंद्र मेश्राम, तुषार खोरगडे, विजय धर्माळे, जयकृष्ण खेडसे, देशपांडे महाराज, गणेश वानखेडे, अवधूत वानखेडे, पुष्पावती पाटील, सुचेता पाटेकर, अर्पिता मुंबरकर, तुलसीदास भोईटे यांनी पुरस्कार परत केले आहेत.

शासन राज्यात व्यसनमुक्ती कार्य करणाऱ्या व्यक्तीला एकीकडे सन्मानित करून व्यसनमुक्ती कार्याकरिता प्रोत्साहित करते. दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेऊन दारू पिण्यास जनतेला प्रोत्साहन देते आहे. शासनाचे कार्य परस्परविरोधी असून चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच राज्यातील व्यसनमुक्ती कार्यकर्ता पुरस्कार मिळालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा हा अपमान आहे. या दुटप्पी धोरणाचा व चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा जाहीर निषेध करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला. चंद्रपूर जिल्हा दारूबंदी पुन्हा लागू करण्यात यावी. बंदीची अंमलबजावणी व्हावी. वर्धा व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याच्या हालचाली त्वरित बंद कराव्यात, असे म्हणणे मंचाने मांडले आहे. दरम्यान, पुरोगामी महाराष्ट्रात प्रतिगामी निर्णय, दारूबंदी व्यसनमुक्तीसाठी आम्ही निर्भय, असे राज्यव्यापी अभियानही मंचाच्या वतीने राबविण्यात आले. त्या अभियान समारोप प्रसंगी पुरस्कार वापसीचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Return of Mahatma Gandhi De-addiction Award on Social Justice Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.