Join us

माझे २५ लाख व्याजासह परत करा; भाजपा नेत्यानं संजय राऊतांना करून दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 12:28 PM

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी माझे पैसे परत मिळवण्यासाठी मदत करावी असा टोलाही कंबोज यांनी शिवसेना नेते संजय राऊतांना लगावला आहे.

मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी भाजपा नेते किरीट सोमय्याविरोधात आरोपांची मालिका सुरू केली असून त्याला आता भाजपा नेते मोहित कंबोज यांनी प्रत्युत्तर दिले आहे. किरीट का कमालची बात करणाऱ्या संजय राऊत यांनी माझे पैसे परत कधी करणार? असा प्रश्न विचारला आहे. मोहित कंबोज यांनी ट्विटर हँडलवरून याबाबतचा स्क्रिनशॉट्सही शेअर केला आहे.

मोहित कंबोज(Mohit Kamboj) यांनी ट्विटरवरून म्हटलंय की, संजय राऊत यांनी माझ्याकडून २०१४ मध्ये रॉयल मराठा इंटरटेन्मेंट नावावर २५ लाख रुपये घेतले होते. हे पैसे व्याजाने परत करू असं संजय राऊत यांनी सांगितले होते. आता माझे पैसे मला परत करा. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी माझे पैसे परत मिळवण्यासाठी मदत करावी असा टोलाही त्यांनी शिवसेना नेते संजय राऊतांना लगावला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

किरीट सोमय्या(Kirit Somaiya) हे स्वतःला भ्रष्टाराचाराचे विरुद्ध लढ्याचे प्रमुख आधारस्तंभ मानतात. आज मी यांचा खरा चेहरा काय आहे त्याचं प्रकरण काढलं आहे. मोतीलाल ओसवाल आणि कंपनी शेअर बाजार कंपनीत ५ हजार ६०० कोटींचा घोटाळा झाला होता. या कंपनीची चौकशी करा अशी मागणी केली होती. त्यांच्या युवक प्रतिष्ठानला मोतीलाल ओसवाल यांच्याकडून मोठ्या मोठ्या लाखोंच्या देणग्या मिळाल्या आहेत. मी फक्त लहान गोष्टी देत आहे दोन चेक दिलेले आहेत. या घोटाळ्यात तुमचा संबंध आहे. तुम्ही कुठला भ्रष्टाचाराचा लढा लढत आहे. तुमच काय उत्तर आहे त्यात तुमचा खुलासा आलेला नाही. युवक प्रतिष्ठाण हे ब्लॅक मनी व्हाइट करण्याचा उद्योग आहे. या सगळ्याची चौकशी धर्मादाय आयुक्त, आर्थिक गुन्हे विभागाकडे याची मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

तसेच ईडीला चौकशी करण्याची मागणी करणार आहे. हा राष्ट्रीय तपास यंत्रणांचा चौकशीचा विषय आहे. ही एक प्रकारची खंडणी आहे. किरीट सोमय्या यांचा चेहरा उघड झाला आहे. याला भाजपा भ्रष्टाचारविरुद्ध लढ्यात सूत्र दिले आहे. यांचा खेळ संपला रोज हे प्रकरण येणार सुरुवात त्यांनी केली शेवट आम्ही करू. भाजपाच्या २८ लोकांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण आहेत ते बाहेर काढू.स्व:तच्या तोंडाला  शेणाचा वास आहे आणि दुसर्‍याच्या चेहर्‍याच्या वास घेणाऱ्यांचा खेळ संपलेला आहे असंही राऊत यांनी सोमय्यांवर आरोप करत म्हटलं आहे.

टॅग्स :संजय राऊतभाजपाकिरीट सोमय्या