मुंबईत परतणाऱ्यांना 14 दिवस घरातच क्वारंटाइन व्हावं लागणार, BMCचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 05:21 PM2020-08-07T17:21:23+5:302020-08-07T17:53:52+5:30
मुंबईतल्या रुग्णांची वाढती संख्या आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
मुंबई : मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना १४ दिवस क्वारंटाइन कालावधीमध्ये राहावं लागतंय. तसा शासनाचा आदेशच आहे. तो क्वारंटाइन कालावधी १० दिवसांचा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुंबईबाहेर परराज्यात जाणारे प्रवासी पुन्हा मुंबईत आल्यास त्यांनाही १४ दिवस गृह अलगीकरणात राहावं लागणार आहे. कोणत्याही राज्यातून मुंबईत येणाऱ्या लोकांना परत आल्यानंतर 14 दिवस घरातच राहावं लागणार आहे. मुंबई महापालिकेने हे नवे आदेश काढले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून हे आदेश काढण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईतल्या रुग्णांची वाढती संख्या आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
ज्या शासकीय अधिकाऱ्यांना मुंबईत आल्यानंतर कामानिमित्त बाहेर पडायचं असल्यास त्यांनासुद्धा परवानगी घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा प्रसार आणि धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या संकटामुळे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या गावी गेले आहेत. आता काही लोक पुन्हा परत येत असल्याने महापालिकेने ही नियमावली प्रसिद्ध केली आहे. कोरोना व्हायरस विरुद्ध खबरदारी म्हणून मुंबईत येणाऱ्या सर्व प्रवाशांना १४ दिवस गृह अलगीकरण करणे अनिवार्य आहे. शासकीय अधिकाऱ्यांना यातून सूट आवश्यक असल्यास amc.projects@mcgm.gov.in वर कामकाजाच्या तपशिलासह दोन दिवस अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे.A 14 day home isolation for all domestic passengers arriving in Mumbai is a compulsory precaution against #coronavirus . Government officials desiring an exemption must write to amc.projects@mcgm.gov.in two working days prior to arrival, with work details #AtMumbaisServicepic.twitter.com/SMCE2Ev1IM
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 7, 2020