मुंबई : मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना १४ दिवस क्वारंटाइन कालावधीमध्ये राहावं लागतंय. तसा शासनाचा आदेशच आहे. तो क्वारंटाइन कालावधी १० दिवसांचा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुंबईबाहेर परराज्यात जाणारे प्रवासी पुन्हा मुंबईत आल्यास त्यांनाही १४ दिवस गृह अलगीकरणात राहावं लागणार आहे. कोणत्याही राज्यातून मुंबईत येणाऱ्या लोकांना परत आल्यानंतर 14 दिवस घरातच राहावं लागणार आहे. मुंबई महापालिकेने हे नवे आदेश काढले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून हे आदेश काढण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईतल्या रुग्णांची वाढती संख्या आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.ज्या शासकीय अधिकाऱ्यांना मुंबईत आल्यानंतर कामानिमित्त बाहेर पडायचं असल्यास त्यांनासुद्धा परवानगी घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा प्रसार आणि धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.
मुंबईत परतणाऱ्यांना 14 दिवस घरातच क्वारंटाइन व्हावं लागणार, BMCचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2020 5:21 PM