मुंबई : ‘लोकमत’ सखी मंच, शुभविधी डॉट कॉम आणि संस्कृती दर्पण प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने ‘उत्सव नवरात्रीचा’ या उपक्रमाला शहर-उपनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा उपक्रम सध्या अंतिम टप्प्यात आला असून, १० आॅक्टोबर रोजी हळदीकुंकू, भोंडला व रासगरब्याचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमांतर्गत विविध सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांच्या प्रांगणात वहिनीसाहेब गेम शो, खास उपवास पाककृती स्पर्धा, पूजा थाळी सजावट स्पर्धा हे खेळ-स्पर्धा राबविण्यात आल्या. या स्पर्धांना विविध वयोगटातील महिला - तरुणींनी सर्वाधिक प्रतिसाद दिला. नवरंगांचा हा सण आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. यानिमित्त १० आॅक्टोबर रोजी हळदीकुंकू, भोंडला व रासगरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम नीळकंठ अपार्टमेंट नवरात्रौत्सव मंडळ, गोकूळदास पास्ता रोड, दादर, पूर्व येथे सायंकाळी ४ वाजता रंगणार आहे. या उपक्रमासाठी संस्कृती दर्पण प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय दास्ताने आणि सचिव श्वेता सरवणकर यांचे सहकार्य लाभले आहे. या उपक्रमासाठी परळ हिंदमाता येथील मनीषा साडी सेंटर हे गिफ्ट पार्टनर आहेत.‘शुभविधी डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून फक्त एका क्लिकवर कोणत्याही सण-समारंभासाठी परिपूर्ण तयारी करण्याची सेवा उपलब्ध आहे. लग्नसोहळे, वास्तुशास्त्र, गृहप्रवेश, पौरोहित्य प्रशिक्षण, ओटीभरण, उपनयन असे सर्व सोहळे आणि कार्यक्रमांसाठी सर्व तयारी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (प्रतिनिधी)
सखी धरणार भोंडल्याचा फेर
By admin | Published: October 09, 2016 3:57 AM