पार्ट्यांमुळे ८० लाखांचा महसूल

By admin | Published: January 1, 2016 01:44 AM2016-01-01T01:44:01+5:302016-01-01T01:44:01+5:30

नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्ट्यांमुळे महसुलात जबरदस्त वाढ झाली आहे. मुंबईत तिकीट आणि दारू असलेल्या पार्ट्यांमुळे शासनाला एकाच दिवसात तब्बल ८० लाख रुपयांहून

Revenue of 80 lakh due to parties | पार्ट्यांमुळे ८० लाखांचा महसूल

पार्ट्यांमुळे ८० लाखांचा महसूल

Next

मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्ट्यांमुळे महसुलात जबरदस्त वाढ झाली आहे. मुंबईत तिकीट आणि दारू असलेल्या पार्ट्यांमुळे शासनाला एकाच दिवसात तब्बल ८० लाख रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे.
मुंबई शहरात तिकीट ठेवून पार्ट्यांचे आयोजन करण्यासाठी ३२ आयोजकांनी मनोरंजन कर विभागाचे परवाने घेतले आहेत. त्यातून शासनाने ४७ लाख ५९ हजार रुपयांचा महसूल गोळा केला आहे. शहरातील मनोरंजन कर विभागाने एकूण ५० लाख रुपयांहून अधिक महसूल जमा केला आहे. मद्याचा समावेश असलेल्या पार्टीच्या एका परवान्यासाठी शासनाला तब्बल १३ हजार २५० रुपये मिळतात. यंदा थर्टी फर्स्टसाठी शहरात ७७ आयोजकांनी विभागाची परवानगी घेतली आहे, तर फक्त थर्टी फर्स्टच्या दिवशी उपनगरातील १८० आयोजकांना प्रशासनाने परवाने दिले आहेत. त्यामुळे शासनाला शहरातून १० लाख २० हजार २५० रुपये आणि उपनगरातून २३ लाख ८५ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. अशा प्रकारे मुंबईकरांच्या न्यू ईयर पार्ट्यांमुळे शासनाला उत्पादन शुल्क विभागाने ३४ लाख ५ हजार २५० महसूल गोळा करून दिला आहे.

Web Title: Revenue of 80 lakh due to parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.