Join us

...जेव्हा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील लालबागमध्ये खातात बटाटेवडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 1:43 PM

महाराष्ट्राचे महसूल, सार्वजानिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आपल्या साध्य सरळ राहणीमानामुळे राज्यातील प्रत्येक जनतेला आपलेसे वाटतात. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चंद्रकांत पाटील यांचे नवनवे पैलू दौऱ्यादरम्यान अनुभवायला मिळतात.

मुंबई : महाराष्ट्राचे महसूल, सार्वजानिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आपल्या साध्य सरळ राहणीमानामुळे राज्यातील प्रत्येक जनतेला आपलेसे वाटतात. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चंद्रकांत पाटील यांचे नवनवे पैलू दौऱ्यादरम्यान अनुभवायला मिळतात. असाच अनुभव त्यांच्या मुंबई दौऱ्यावेळी अनेकांना अनुभवायला मिळाला. रविवारी (10 फेब्रुवारी) आज सकाळी आपल्या नियोजित दौऱ्याला जाण्यासाठी चंद्रकांत पाटील कल्याण येथून निघाले होते. त्यावेळी लालाबाग परिसरातून जात असताना त्यांना जुन्या दिवसांची आठवण झाली. लालबाग परिसरातून जात असताना त्यांनी आपल्या वाहन चालकाला गाडी मुंबईच्या लाडूसम्राट येथे थांबवायला सांगितली, अन् वडापावचा आस्वाद घेण्यासाठी ते सरळ लाडूसम्राटच्या हॉटेलात गेले.

यावेळी राज्यातील इतक्या मोठ्या पदावरील व्यक्ती आपल्या हॉटेलमध्ये आल्याचे पाहून अनेकांचा गोंधळ उडाला. दुकानाचे मालक राक्षे धावत-पळत येऊन त्यांचे आदारतिथ्य करू लागले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राक्षेंना मध्येच अडवलं आणि म्हटले तुम्ही जर माझ्याकडून पैसे घेणार असाल, तरच मी आपल्याकडे नाष्टा करेन, अशी सूचना केली. यावर राक्षेंनीही होकार दर्शवला. यानंतर पाटील यांनी आपल्या आवडीच्या वडापाव आणि कोथिंबिर वडीचा मनसोक्त आस्वाद घेतला. नाष्टा केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी राक्षेंच्या जीवनप्रवासाविषयीची माहिती जाणून घेतली. 

चंद्रकांत पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वातील हा पैलू पाहून हॉटेलमध्ये उपस्थित प्रत्येकजण भारावून गेले होते. राज्यातला एवढ्या मोठ्या मंत्रिपदावर कार्यरत असूनही, जमिनीशी नाळ धरुन आहे, अशी चर्चा हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांमध्ये रंगली होती. तर एका देव माणसाने आज माझ्या दुकानाला भेट दिल्याची भावना हॉटेल मालक राक्षे यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :चंद्रकांत पाटील