Join us

उरणमध्ये 13 कोटींचा महसूल घोटाळा

By admin | Published: September 01, 2014 10:46 PM

जेएनपीटी बंदरामार्गे 11 कोटी 54 लाख 92 हजार 965 रुपये किंमतीच्या 78क्9क् किलो ब्रासच्या वस्तू निर्यात करण्याला मुख्य सूत्रधार महम्मद असद अली यांनी सीमाशुल्क विभागाकडून परवानगी घेतली.

उरण : 12क् कोटींच्या निर्यात मालावर 13 कोटींचा महसूलचा घोटाळा (ड्रॉ बॅक) केल्याच्या संशयावरुन सीमाशुल्क विभागाच्या डीआरआय अधिका:यांनी मुख्य सूत्रधार महम्मद असद अली (39) याच्यासह त्याचा सहकारी पांडुरंग डेरे (32), रामदास पावडे (33), मनोज कदम (44) या तीन क्लिंरिंग एजंट यांना न्हावा-शेवा सीमाशुल्क विभागाच्या डीआरआय अधिका:यांनी मुद्देमालासह अटक केली. उरण न्यायालयाने चारही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 
जेएनपीटी बंदरामार्गे 11 कोटी 54 लाख 92 हजार 965 रुपये किंमतीच्या 78क्9क् किलो ब्रासच्या वस्तू निर्यात करण्याला मुख्य सूत्रधार महम्मद असद अली यांनी सीमाशुल्क विभागाकडून परवानगी घेतली. 3543 पॅकेजमधून 13 कंटेनरमध्ये निर्यात होणारा हा माल जेएनपीटी परिसरातील विविध सीएफएस आणि डॉकमध्ये ठेवण्यात आला होता, मात्र सीमाशुल्क विभागाकडून परवानगी घेतलेल्या निर्यात ब्रास धातूच्या वस्तूंऐवजी रद्दीपेपर, चिंध्या, पुठ्ठे, भंगार प्लेट निर्यात करण्यासाठी आरोपीने 47 शिपिंगच्या नावाने बनावट बिले, कागदपत्रे बनवून 5 ते 28 जून दरम्यान प्रय} केला होता. आरोपी महम्मद असद अली यांनी पांडुरंग डेरे (32), रामदास पावडे (33), मनोज कदम (44) या तीन क्लिरिंग एजंट यांच्या मदतीने आणि संगनमताने धातूच्या मालाऐवजी वेगवेगळय़ा वजनाच्या बॉक्समध्ये रद्दीपेपर, चिंध्या, पुठ्ठे, भ्ांगार प्लेट भरुन निर्यात करण्याचा प्रय} चालविला होता. 
सीमाशुल्क विभागाची फसवणूक करीत 1 कोटी 71 हजार रुपयांचा महसूल बुडवून बनावट कागदपत्रंद्वारे मालाची निर्यात करण्याचा प्रय} सीमाशुल्कच्या डीआरआय विभागाच्या अधिका:यांनी हाणून पाडला. डीआरआय विभागानुसार मालाची किंमत (एफओबी) 12क् कोटींच्या घरात असून त्यापोटी 13 कोटी सबसिडी (ड्रॉ बॅक) अपेक्षित होती. याप्रकरणी 29 शिपिंग एजन्सीज संशयाच्या घे:यात असून त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. 
याप्रकरणी डीआरआय विभागाच्या अधिका:यांनी मुख्य सूत्रधार महम्मद असद अली याच्यासह त्याला सहकार्य करणा:या पांडुरंग डेरे, रामदास पावडे, मनोज कदम, या तीन क्लिरिंग एजंट यांना न्हावा-शेवा सीमाशुल्क विभागाच्या डीआरआय अधिका:यांनी मुद्देमालासह अटक केली आहे. उरण न्यायालयाने चारही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (वार्ताहर)
 
दुबईवा:या केल्याचेही उघड
डीआरआय तपास अधिका:यांनुसार मुख्य सूत्रधार महम्मद असद अली याने अनेकवेळा दुबईवा:या केल्याचेही तपासात उघडकीस आले आहे. महम्मद अली याच्यावर याआधीही गाङिायाबादमध्ये सीबीआयने विविध कस्टम कंपन्या स्थापन करुन 13 कोटीहून अधिक कोटींचा महसूल घोटाळा केल्याचा संशय अधिका:यांकडून व्यक्त केला जात आहे. तपासात संघटित गुन्हय़ाची आणखी काही प्रकरणो उघडकीस येण्याची शक्यताही डीआरआयच्या तपास अधिका:यांनी व्यक्त केली आहे.