पर्यटनासह राज्याच्या महसुलालाही चालना मिळणे शक्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 02:18 AM2017-11-05T02:18:54+5:302017-11-05T02:18:59+5:30

बृहन्मुंबई महानगरपालिकेने रूफटॉप रेस्टॉरंट्सना परवानगी दिली आहे. आपल्या शहराला सुंदर समुद्र किना-याची जोड लाभल्याने, राज्यातील पर्यटनाच्या दिशेने पालिकेने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे म्हणायला हरकत नाही.

The revenue of the state can be boosted with tourism! | पर्यटनासह राज्याच्या महसुलालाही चालना मिळणे शक्य!

पर्यटनासह राज्याच्या महसुलालाही चालना मिळणे शक्य!

Next

बृहन्मुंबई महानगरपालिकेने रूफटॉप रेस्टॉरंट्सना परवानगी दिली आहे. आपल्या शहराला सुंदर समुद्र किना-याची जोड लाभल्याने, राज्यातील पर्यटनाच्या दिशेने पालिकेने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे म्हणायला हरकत नाही. पालिकेकडून अशा प्रकारच्या बांधकामाला संमती मिळाल्याने, आपल्यालाही आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्तम रूफटॉप रेस्टॉरंट्स उभारता येतील.
सध्या स्कायबार्स आणि रूफटॉप रेस्टॉरंट्सचा ट्रेंड जगात सुरू आहे. मुंबई हे देशाचे व्यावसायिक केंद्र असूनही येथे अशा पयार्यांची सोय नव्हती. आजपर्यंत आपल्याकडे स्काय लाउंज होते. मात्र, इथे सर्व वयोगटांतील घटकांना प्रवेश नव्हता. मात्र, आता पालिकेने परवानगी दिल्यामुळे मुंबईतही रूफटॉप रेस्टॉरंट्सचा आनंद सर्व वयोगटांतील पर्यटकांना लुटता येणार आहे. असा प्रकार यापूर्वी झाला नव्हता. पर्यटकांना आकर्षित करण्यासोबतच उत्तम वातावरण निर्माण करणे, हीदेखील काळाची गरज आहे.
आज सिंगापूर, हाँगकाँग अशा विविध देशांमध्ये उत्कृष्ट रूफटॉप रेस्टॉरंट्स हे नयनरम्य देखावे आणि वातावरण उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळेच आपणही या गोष्टीकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे. सोबतच ग्राहक आणि पर्यटकांच्या सुरक्षेलाही प्राधान्य द्यायला हवे.
मुंबईत जागेची चणचण कायमच भासते. विशेषत: हॉटेल उद्योगाच्या विस्तारात जागेची समस्या सर्वात मोठी आहे. आता रूफटॉप रेस्टॉरंट्समुळे ही समस्यादेखील काही अंशी सुटण्यास मदत होईल. महत्त्वाची बाब म्हणजे, ही समस्या सोडविण्यासोबतच महसुलाच्या रूपाने प्रशासनाच्या उत्पन्नातदेखील वाढ होईल. सोबतच सुमारे ३० टक्क्यांहून अधिक रोजगार वाढीस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने आर्थिकदृष्ट्याही उचललेले हे अतिशय महत्त्वाचे
पाऊल आहे.
हॉटेलच्या छताचा वापर पर्यटनासाठी होऊ शकतो, हे प्रशासनाला पटवून देण्यासाठी काम आहार आणि हॉटेल अँड रेस्टॉरन्ट असोसिएशन (वेस्टर्न इंडिया) ने सातत्याने प्रयत्न केले. यामध्ये अनेक लोकप्रतिनिधींची मदतही झाली. पालिकेच्या परवागनीमुळे आता खुल्या छताचा वापर निवांतपणा आणि मनोरंजनासाठी करता येणार आहे. जगभर उदयला येत असलेल्या या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे देशी, तसेच परदेशी पर्यटकही नक्कीच स्वागत करतील, यात शंका नाही.

(आदर्श शेट्टी, अध्यक्ष-आहार; दिलीप दातवानी, अध्यक्ष-हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन वेस्टर्न इंडिया)

सुगीचे दिवस
रूफटॉप रेस्टॉरंटबाबत आयुक्तांनी घोषित केलेल्या निर्णयामुळे नक्कीच हॉटेल जगताला सुगीचे दिवस येतील. कर आणि भाडे याचे संतुलन साधण्यास रूफटॉपची मोलाची मदत होईल.
- आदर्श शेट्टी, अध्यक्ष-आहार

निसर्गाचे सानिध्य
आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी मुंबई हे मुख्य पर्यटन केंद्र असून, या ठिकाणच्या विस्तीर्ण समुद्रकिनाºयासह विस्तृत क्षितिजामुळे शहराचा नेत्रसुखद असा देखावा रूफटॉपच्या माध्यमातून पाहता येईल. एकंदरीतच चमचमत्या ताºयांंच्या छताखाली भोजनाचा आनंद लुटण्याचा चित्रपटात दिसणारा हा क्षण आता प्रत्यक्षात अनुभवता येणार आहे.
- दिलीप दातवानी, अध्यक्ष, हॉटेल अँड रेस्टॉरंट वेस्टर्न इंडिया

Web Title: The revenue of the state can be boosted with tourism!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई