Join us

ऑनलाइन शॉपिंग पार्सलच्या माध्यमातून रेल्वेला मिळणार महसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2019 1:11 AM

मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण या स्थानकांवर पिक पॉइंट उभारण्यात येणार आहेत.

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य रेल्वे स्थानकावर एका प्रसिद्ध ऑनलाइन शॉपिग कंपनीचे पिक पॉइंट उभारण्यात येणार आहे. ग्राहकांनी ऑनलाइन मागविलेल्या साम्रगीचे पार्सल मध्य रेल्वेच्या स्थानकावर ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. यातून मध्य रेल्वे प्रशासनाला लाखोंचा महसूल मिळेल.

मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण या स्थानकांवर पिक पॉइंट उभारण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेशी ३ महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर करार केला आहे. यातून मध्य रेल्वे प्रशासनाला एकूण ६ लाख रुपयांचा महसूल मिळेल. पिक पॉइंट प्रकल्प यशस्वी झाल्यास मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील अनेक स्थानकांवर पिक पॉइंट वाढविण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

इच्छित वेळीत एखादी वस्तू किंवा साहित्य ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पिक पॉइंट उभारण्यात येणार आहेत. ग्राहकांनी आॅनलाइन मागविलेली वस्तू मध्य रेल्वे स्थानकांवर ग्राहकांना उपलब्ध होईल.

टॅग्स :रेल्वे