विकासकामांचा आढावा मुख्यमंत्री डॅश बोर्डवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 05:20 AM2019-07-16T05:20:15+5:302019-07-16T05:20:21+5:30
शासनाच्या सर्व योजनांचा एकाच वेळी आढावा घेता येणारे मुख्यमंत्री डॅशबोर्डचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी मंत्रालयात उद्घाटन झाले.
मुंबई : शासनाच्या सर्व योजनांचा एकाच वेळी आढावा घेता येणारे मुख्यमंत्री डॅशबोर्डचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी मंत्रालयात उद्घाटन झाले. या डॅशबोर्ड मुळे लोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे. त्याच बरोबर कामकाजात अधिक पारदर्शकता येऊन प्रशासनाची विश्वासर्हता वाढणार आहे.
या डॅशबोर्डचा उपयोग प्रत्येक विभागातील सचिवांना कारता येणार आहे. या डॅशबोर्डचा आढावा मुख्यमंत्री स्वत: वेळोवेळी घेणार आहेत. या डॅशबोर्डमुळे एखाद्या योजनेचा आलेख कसा आहे याचा तालुका निहाय आढावा आता एका क्लीकवर घेता येणार आहे.तसेच प्रथम दर्शनी निदर्शनास येणाऱ्या प्रमुख अडचणींचेही तत्काळ निरसन करता येणे शक्य होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना, जलयुक्त शिवार योजना, मध्यान्ह भोजन योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या योजनांच्या प्रगतीचा आणि सद्य स्थितीचा आढावा घेता येईल.