लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई- महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून दि,१ मे रोजी सकाळी ११ वाजता टिळक भवन,दादर येथे महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसची आढावा बैठक आयोजित केली आहे. आढावा बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे संघटनात्मक कार्य, आदिवासींचा सहभाग,आदिवासींचे प्रश्न,काँग्रेस पक्षाने आदिवासींसाठी केलेले कार्य,लीडरशिप डेव्हलपमेंट मिशन ( एलडीएम) या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. व विदर्भ संयोजक उपजीविका मंच मा.दिलीप गोडे यांचे वन हक्क कायदा, पेसा या विषयांवर विशेष व्याख्यानाचे आयोजन केले आहे.
या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले . एस.सी, एस. टी, ओबीसी, व मायनोरीटी, चे राष्ट्रीय समन्वयक के राजू साहेब, अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा सहप्रभारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आशिष दुआ, राष्ट्रीय समन्वयक आदिवासी काँग्रेस के.सी. गुमारिया, काँग्रेस पक्षाचे विधानसभा गटनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री आमदार के.सी. पाडवी, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार सहसराम कोरोटे, आमदार हिरामण कोसकर, आमदार शिरीष नाईक, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी खासदार बापूसाहेब चौरे, विदर्भ संयोजक उपजीविका मंच दिलीप गोडे, माजी मंत्री वसंत पुरके, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी मंत्री स्वरुपसिंग नाईक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी व मुंबई आदिवासी कॉंग्रेस अध्यक्ष सुनिल कुमरे यांनी ही माहिती दिली.
सर्व महाराष्ट्र प्रदेश व मुंबई प्रदेश आदिवासी काँग्रेसचे राज्य कार्यकारणीचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हाकार्यकरणीचे सदस्य, तालुकाध्यक्ष, तालुका कार्यकारिणीचे सदस्य , आदिवासी नेते , जी.प. सदस्य, प.स. सदस्य, ग्रामपंचायत सदस्य हजारोंच्या संख्येत उपस्थित राहणार आहेत अशी माहिती माजी डॉ. नामदेवराव उसेंडी व सुनिल कुमरे यांनी दिली.