मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा हिमालय पादचारी पूल हा या परिसरातील एकमेव पूल होता. मात्र १४ मार्च रोजी हा पूल पडल्यानंतर त्या जागी नवीन पूल बांधण्यासाठी बराच काळ लागणार आहे. पूल नसल्यामुळे या रेल्वे स्थानकावर पोहोचण्यासाठी नागरिकांना भुयारी मार्गाचा वापर अथवा रस्ता ओलांडावा लागत आहे. याचा आढावा घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. येथील पादचारी आणि वाहतुकीचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी रस्ते व वाहतूक विभागाला दिले आहेत.सीएसटी हे महत्त्वाचे स्थानक असल्याने या ठिकाणी दररोज लाखो प्रवाशांची सतत वर्दळ असते. त्यामुळे येथे तातडीने पूल बांधण्याची मागणी होत आहे. त्यानुसार येथील वाहतुकीचा अभ्यास करण्यात येईल.
अहवाल सादर करणारपालिकेचे पथक सर्वेक्षणासाठी दिवसातून तीनवेळा सकाळ, दुपार, संध्याकाळ या सत्रात पादचाऱ्यांची नोंद करणार आहे. सकाळी ९.३० आणि ११, दुपारी १२.३० आणि २ तर संध्याकाळी ५ आणि ७ वाजता या मार्गावरून जाणाºया पादचाºयांची त्यात नोंद असेल.दुर्घटनाग्रस्त पादचारी पुलाखालील वाहतूक सिग्नल परिसराची पाहणी होईल. याबाबतचा अहवाल पालिकेच्या स्वतंत्र वाहनतळ प्राधिकरणाला सादर करण्यात येणार आहे.