चालीसाऐवजी विकासाची संजीवनी पोहोचवा - राष्ट्रवादी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 10:25 AM2022-04-23T10:25:59+5:302022-04-23T10:28:26+5:30

आधी मनसे आणि आता खा. नवनीत राणा, आ. रवी राणा यांच्या हनुमान चालीसाबाबतच्या भूमिकेमुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी भाजप आणि त्यांचे लोकप्रतिनिधी नको ते उद्योग करत आहेत.

Revitalize development instead of chalisa says NCP | चालीसाऐवजी विकासाची संजीवनी पोहोचवा - राष्ट्रवादी

चालीसाऐवजी विकासाची संजीवनी पोहोचवा - राष्ट्रवादी

Next

मुंबई: देशातील आणि राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलायचे नाही, जातीय तेढ निर्माण करत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करायचे, या असल्या उद्योगांनी राज्यातील सरकार अस्थिर होणार नाही तर ते अधिक भक्कम होईल, असा इशारा देतानाच हनुमान चालीसा पठणाच्या कार्यक्रमाऐवजी विकासाची संजीवनी लोकांपर्यंत पोहोचवा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसने टोला हाणला आहे.

आधी मनसे आणि आता खा. नवनीत राणा, आ. रवी राणा यांच्या हनुमान चालीसाबाबतच्या भूमिकेमुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी भाजप आणि त्यांचे लोकप्रतिनिधी नको ते उद्योग करत आहेत. मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचा कार्यक्रम राणा दाम्पत्याने जाहीर केला आहे. मुळात लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघात विकासकामे व त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यायचा असतो. मात्र, भाजपच्या विचाराने प्रेरित लोकप्रतिनिधींना जनतेच्या विकासकामांमध्ये रस नाही. त्यांना राज्यातील सरकार अस्थिर कसं होईल, धार्मिक व जातीय तेढ कशी निर्माण करता येईल, यामध्ये जास्त रस आहे, असा आरोपही महेश तपासे यांनी केला.

महागाईवर मात्र माैन
कोळशाचे व वाढत्या महागाईचे नियोजन मोदी सरकारने का केले नाही? याची विचारणा करायला हवी होती. मात्र, दुर्दैवाने भाजपचे लोकप्रतिनिधी हेच प्रश्न विचारताना दिसत नाहीत, असे तपासे म्हणाले.
 

Web Title: Revitalize development instead of chalisa says NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.