हद्दीतील ७१ सुक्या विहिरींना करणार पुनरुज्जीवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 05:00 AM2019-05-19T05:00:59+5:302019-05-19T05:01:02+5:30

पश्चिम रेल्वे प्रशासन । दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाय

Revival of 71 dry wells in the jurisdiction | हद्दीतील ७१ सुक्या विहिरींना करणार पुनरुज्जीवित

हद्दीतील ७१ सुक्या विहिरींना करणार पुनरुज्जीवित

googlenewsNext

मुंबई : राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचे निवारण करण्यासाठी, तसेच पाणीसाठा वाढविण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेतला असून, पुढील दोन वर्षांत पश्चिम रेल्वे हद्दीतील ७१ सुक्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.


पश्चिम रेल्वे प्रशासनाने पाणी वाचविण्याची मोहीम सुरू केली आहे. यासाठी पुढील पाच वर्षांत ‘पाणी वाचवा, ऊर्जा वाचवा’ या घोषवाक्यातून प्रेरणा घेत कामे केली जातील. सोबतच पश्चिम रेल्वे हद्दीतील ७१ सुक्या विहिरींना पुढील दोन वर्षांत पुनरुज्जीवित करण्यात येईल. या विहिरींतील पाण्याचा वापर रेल्वे प्रशासन आणि स्थानिकांना करता येईल.


रेल्वे परिसरात जेथे पाणी वाया जाते अथवा पाणी गळती होत असेल, त्याला रोखण्यात येणार आहे. रेल्वे भवन, वर्कशॉप, शेड, स्थानक इत्यादी ठिकाणी पाण्याचे मीटर लावण्यात येतील.


२०१८ -१९ या वर्षात ४९ ठिकाणी, २०१७-१८ मध्ये १७ ठिकाणी छतावर रेनवॉटर हार्वेस्टिंग उभारण्यात आले. १९ ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम पश्चिम रेल्वे प्रशासन पूर्ण करणार आहे.

जलवाहिन्यांची दुरुस्ती
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले की, पाणी वाया जाण्याचे प्रमाण रोखण्यात येत आहे. सर्व वॉल्व, नळ यांची दुरुस्ती केली आहे. गंजलेल्या जलवाहिनींची दुरुस्ती केली असून, नवीन जलवाहिनी बसविण्यात आली आहे. उद्यान आणि बाग-बगीच्यांसाठी तुषार सिंचनाचा वापर होत आहे.

Web Title: Revival of 71 dry wells in the jurisdiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.