प्रक्रिया केलेले पाणी विझविणार आग, नळखांब पुनर्जीवित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 06:47 AM2017-10-20T06:47:17+5:302017-10-20T06:48:36+5:30

मुंबईत बंद पडलेले नळखांब (फायर हायड्रंट) पुनर्जीवित करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार कुलाबा येथील सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्रातील पाण्याचा वापर नळखांबद्वारे आग विझविण्यासाठी केला जाणार आहे.

 Reviving the processed water, the fire and the tube will be revived | प्रक्रिया केलेले पाणी विझविणार आग, नळखांब पुनर्जीवित करणार

प्रक्रिया केलेले पाणी विझविणार आग, नळखांब पुनर्जीवित करणार

Next

मुंबई : मुंबईत बंद पडलेले नळखांब (फायर हायड्रंट) पुनर्जीवित करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार कुलाबा येथील सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्रातील पाण्याचा वापर नळखांबद्वारे आग विझविण्यासाठी केला जाणार आहे. त्यामुळे वाहतूककोंडीत अडकून आगीचा बंब घटनास्थळी लेट होण्याचा प्रकार आटोक्यात येऊन, वेळेत मदतकार्याला सुरुवात होऊ शकेल.
मुंबईत सुमारे पाच हजार नळखांब आहेत. या नळखांबाद्वारे जमिनीखालच्या पाण्याचा वापर आग विझविण्यासाठी करण्यात येत असे. मात्र, मुंबईचा झपाट्याने विकास होत गेला आणि हे नळखांब जमिनीखाली गाडले गेले. यापैकी जेमतेम २० टक्के नळखांब सुरू आहेत. परिणामी, टँकर अथवा विहिरीच्या पाण्याने आग विझवावी लागत आहे. अनेक वेळा जवळपास ही सोय नसल्यास दुसºया विभागातून मदत मागवावी लागते. त्यामुळे आग विझविण्यास विलंब होऊन धोका वाढतो.
जोगेश्वरी येथे गेल्या सहा महिन्यांत आग लागण्याच्या तीन घटना घडल्या. मात्र, तेथील रस्त्यावरील नळखांब बंद असल्याने अंधेरीतून मदत मागवावी लागली. अनेक वेळा वाहतूककोंडीमुळे टँकर पोहोचत नाही. त्यामुळे पालिकेने सकारात्मक पावले उचलून, रस्ते व पदपथाखाली गाडले गेलेले नळखांब पुनर्जीवित करावे, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे. मुंबईतील बंद नळखांब पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी पालिका प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी कुलाबा येथील सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्रातील पाणी नळखांबद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या केंद्रात दररोज तीस दशलक्ष सीट्स सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. हे पाणी आग विझविणे तसेच उद्यानांमध्ये वापरण्यात येणार आहे.

मुंबईमधील नळखांबचा सातत्याने वापर झाला पाहिजे; शिवाय नळखांबची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती झाली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील नळखांबच्या वापराबाबतचे प्रशिक्षण मुंबईकरांना दिले पाहिजे आणि असे झाले, तर वारंवार घडणाºया आगीच्या दुर्घटनां वेळी संपूर्णत: अग्निशमन दलावर अवलंबून राहावे लागणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
काही नळखांब तर जमिनीखाली गाडले गेले आहेत. तर काहींलगत अतिक्रमणे झाली आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाने याकडे साफ कानाडोळा केला आहे.

फक्त ९२ फायर नळखांब सुरू

मुंबई शहर आणि उपनगरांत लागणाºया आगीच्या दुर्घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठिकठिकाणी बसविलेले नळखांब म्हणजे मदतनीसच. येथे दाटीवाटीने वसलेल्या इमारतींच्या परिसरात आग लागल्यास ती विझविण्यासाठी अग्निशमन यंत्रणा फायर नळखांबची मदत घेते.
येथील सुमारे १० हजार ४९७ ब्रिटिशकालीन नळखांबांपैकी ९ हजार ४०५ नळखांब बंद अवस्थेत आहेत. म्हणजे केवळ सुमारे ९२ नळखांब सुरू असल्याची वस्तुस्थिती काही महिन्यांपूर्वी समोर आली होती.
मुळात महापालिका नळखांबच्या आकडेवारीबाबत कायमच वस्तुस्थिती लपविण्याचा प्रयत्न करते. अर्धवट माहिती देते. परिणामी, वस्तुस्थिती समोर येत नाही.
आग विझविणाºया गाडीचा पाइप या नळखांबाला जोडल्यास आग विझविण्यासाठी आवश्यक पाण्याचा मारा करणे शक्य होते; परंतु आजघडीला या नळखांबची दुरवस्था झाली आहे.
आगीच्या दुर्घटनांवर नियंत्रण मिळविणाºया मुंबई अग्निशमन दलाकडील साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे आरोप झाले आहेत. याप्रकरणी पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला वारंवार धारेवर धरले आहे.
मागील तीन वर्षांपासून अग्निशमन दल कात टाकतेय, असे म्हटले जात आहे. पण, बदल होत नसल्याचे चित्र आहे. महत्त्वाचे म्हणजे ब्रिटन, जर्मनीतील कंपन्यांची उत्पादने दाखवून चिनी बनावटीचे साहित्य जवानांना दिले जात असल्याचा सूर पालिका वर्तुळात आहे.

Web Title:  Reviving the processed water, the fire and the tube will be revived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.