Join us

Rhea Chakraborty : रिया चक्रवर्तीला कोर्टाने दिला दिलासा; परदेशात जाण्याची मिळाली मुभा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 8:20 PM

Rhea Chakraborty : भारतीय दूतावासाला दररोज कळवावे लागेल

मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant singh rajput) मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणातील आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबईतील विशेष न्यायालयाने बुधवारी आयफा अवॉर्ड (IIFA Award)  शोमध्ये सहभागी होण्यासाठी चार दिवस अबुधाबीला जाण्याची परवानगी दिली. विशेष न्यायाधीश ए.ए. जोगळेकर यांनी रिया चक्रवर्तीचा (Rhea Chakraborty) पासपोर्ट तिच्याकडे सोपवण्याचे निर्देश नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ला दिले होते. मात्र आता काही अटींसह तिला 2 ते 5 जून दरम्यान अबुधाबीला जाण्याची परवानगी दिली.कोर्टाने चक्रवर्तीवर अनेक अटी घातल्या, की ती दररोज अबुधाबीमधील भारतीय दूतावासात हजर राहून तिची उपस्थिती लावेल, तिचा प्रवास NCB ला कळवेल आणि तिचा पासपोर्ट भारतात आली की  पुन्हा NCB कडे सुपूर्द करेल. विशेष न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, "अर्जदाराला या न्यायालयाच्या रजिस्ट्रारला एक लाख रुपयांची अतिरिक्त रोख सादर करण्याचे निर्देश दिले आहेत."रियाला आयफासाठी आमंत्रित करण्यात आले आहेरिया चक्रवर्तीचे वकील निखिल मानेशिंदे यांनी न्यायालयाला सांगितले की, अभिनेत्रीला इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी (आयफा) च्या संचालकांनी ग्रीन कार्पेटवर चालण्यासाठी, पुरस्कार सादर करण्यासाठी आणि संवादात सामी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. गुन्हेगारी खटल्याचा चक्रवर्ती यांच्या अभिनय कारकिर्दीवर परिणाम झाला आहे आणि त्यांना आर्थिक नुकसानीबरोबरच अडचणींचाही सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्याच्या अभिनय क्षेत्रातील त्यांच्या संभावनांसाठी अशा संधी महत्त्वाच्या आहेत.”रियाला सप्टेंबर 2020 मध्ये अटक करण्यात आली होतीजून 2020 मध्ये, 34 वर्षीय अभिनेता सुशांत सिंग राजपूत 14 जून 2020 रोजी उपनगरातील वांद्रे येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला. त्यांच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर, NCB बॉलीवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये कथित ड्रग किंवा ड्रग्सच्या वापराची चौकशी करत आहे.या प्रकरणी रिया चक्रवर्तीला सप्टेंबर 2020 मध्ये अटक करण्यात आली होती. अटकेनंतर सुमारे महिनाभरात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. रिया व्यतिरिक्त, तिचा भाऊ शोइक चक्रवर्ती आणि इतर अनेकांवर देखील कथित अमली पदार्थांचे सेवन, बाळगणे आदी आरोप आहेत. त्यापैकी बहुतांश सध्या जामिनावर बाहेर आहेत.

 

 

टॅग्स :रिया चक्रवर्तीआयफा अॅवॉर्डन्यायालयसुशांत सिंग रजपूत