Join us

हा मराठमोळा खासदार कामाला लय भारी, 539 जणांच्या सर्वेक्षणात नंबर 1

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 8:54 PM

खासदारांच्या वैयक्तीक कामगिरीत तसेच खासदार खाजगी विधेयक व संसदेतील हजेरी या तिघांमध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आला. तर संसदीय क्षेत्रातील कामगिरी,जनतेतील प्रतिमा,संसदीय क्षेत्रातील हजेरी,स्थानिक मुद्दे या चारही विषयांमध्ये त्यांना 5 पैकी 4.9 गुण मिळाले.

ठळक मुद्देखासदारांच्या वैयक्तीक कामगिरीत तसेच खासदार खाजगी विधेयक व संसदेतील हजेरी या तिघांमध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आला. तर संसदीय क्षेत्रातील कामगिरी,जनतेतील प्रतिमा,संसदीय क्षेत्रातील हजेरी,स्थानिक मुद्दे या चारही विषयांमध्ये त्यांना 5 पैकी 4.9 गुण मिळाले

मनोहर कुंभेजकर

मुंबई : संसदीय पार्लमेंटरी बिझनेस पोर्टल 1 च्या माध्यमातून देशातील 539 खासदारांच्या कामगिरीचा लेखाजोखा नुकताच सादर करण्यात आला. देशातील 539 खासदारांनी केलेल्या सगळ्या कामांच्या आधारावर त्यांच्या वेगवेगळ्या कामांचे वर्गीकरण करण्यात आले. यात उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी हे अव्वल ठरले. त्यांची ही खासदार म्हणून दुसरी टर्म असून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अभिनेत्री व काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर तर 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचा दारुण पराभव केला.

खासदारांच्या वैयक्तीक कामगिरीत तसेच खासदार खाजगी विधेयक व संसदेतील हजेरी या तिघांमध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आला. तर संसदीय क्षेत्रातील कामगिरी,जनतेतील प्रतिमा,संसदीय क्षेत्रातील हजेरी,स्थानिक मुद्दे या चारही विषयांमध्ये त्यांना 5 पैकी 4.9 गुण मिळाले. संसदेत गोपाळ शेट्टी यांचा 539 खासदारांमध्ये 4 था क्रमांक आला. गोपाळ शेट्टी हे देशातील सर्वोकृष्ठ खासदार ठरले याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली.त्यामुळे आज सकाळी त्यांच्या बोरिवली पश्चिम लोकमान्य नगर येथील कार्यालयात त्यांचे अभिनंदन करण्यासाठी उत्तर मुंबईतील भाजपाचे आमदार,पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते.

देशातील सर्वोकृष्ठ खासदार म्हणून आपल्या कामगिरीची नोंद घेतली याचे रहस्य काय, असे विचारले असता नागरिकांशी सतत असलेला जनसंपर्क, विकासाचा ध्यास,वक्तशीरपणा, जिथे अपेक्षित तिथे उपस्थित, प्रशासनाकडून जर सनदशीर मार्गाने जर नागरिकांचे प्रश्न सुटत नसतील तर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील ही आपली कार्यपद्धती असल्याची माहिती खासदार शेट्टी यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :गोपाळ शेट्टीमुंबईखासदार