तालुक्यात ८५६० हजार हेक्टरवर भात
By Admin | Published: June 27, 2015 11:47 PM2015-06-27T23:47:30+5:302015-06-27T23:47:30+5:30
विक्रमगड तालुक्यात गेल्या आठ ते दहा दिवसापासून पाऊसच सुरू असल्याने काहीची पेरणी तर काही शेतकऱ्यांची भात लागवड राहीली होती
विक्रमगड : विक्रमगड तालुक्यात गेल्या आठ ते दहा दिवसापासून पाऊसच सुरू असल्याने काहीची पेरणी तर काही शेतकऱ्यांची भात लागवड राहीली होती परंतु दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे.
तालुक्यात ८५६० हजार हेक्टवर भात शेती केली जात असून यामध्ये सुवर्णा, गुजरात ११, गुजरात ३, कोलम, जया या भात बियाणाची लागवड केली आहे. गेल्या आठवड्यापासून पंचायत समिती कृषी विभागातून ५० टक्के अनुदानातून कर्जत- ३, या भात बियाण्याचे वाटप केले जात आहे. तर आदिवासी उपयोजनेतून २३ लाभार्थ्यांना मोफत बियाणे दिल्याची माहिती कृषी अधिकारी आर. डी. निमसे यांनी दिली.
तालुक्यात बांधावरील खत योजनेच्या शेतकऱ्यांनी चालू वर्षी लाभ न घेतल्याने शेतकऱ्यांनी दुकानातूनच खताची खरेदी केली आहे. शेतकऱ्यांना खत टंचाईचा सामना करावा लागणार नसल्याचे कृषी विभागाने माहिती दिली आहे. (वार्ताहर)