महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास हिंदी भाषेतही यावा - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:07 AM2021-03-08T04:07:16+5:302021-03-08T04:07:16+5:30

राज्यपाल; ‘आंग्रे घराण्याचा इतिहास’ पुस्तकाचे प्रकाशन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्राला इतिहासाचा समृद्ध वारसा लाभला आहे. हा इतिहास ...

The rich history of Maharashtra should also come in Hindi language - Governor Bhagat Singh Koshyari | महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास हिंदी भाषेतही यावा - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास हिंदी भाषेतही यावा - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

googlenewsNext

राज्यपाल; ‘आंग्रे घराण्याचा इतिहास’ पुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्राला इतिहासाचा समृद्ध वारसा लाभला आहे. हा इतिहास हिंदी भाषेत भाषांतरित झाल्यास सर्व देशाला त्याचा लाभ होईल, असे सांगत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याच्या इतिहासाचे हिंदी भाषांतर होण्याची आवश्यकता व्यक्त केली.

इंग्रज, फ्रेंच, डच व पोर्तुगीज अशा परकीय सत्तांना आपले दस्तक (परवाने) घेण्यास बाध्य करणारे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आंग्रे घराण्याचा इतिहास असलेल्या ‘कुलाबकर आंग्रे सरखेल : आंग्रे घराण्याचा इतिहास’ या पुस्तकाच्या पुनर्मुद्रित आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी राजभवन येथे झाले. दामोदर गोपाळ ढबू यांनी लिहिलेले हे पुस्तक प्रथम १९३९ साली प्रसिद्ध झाले होते. या पुस्तकाचे पुनर्मुद्रण करण्यात आले आहे. प्रकाशन सोहळ्याला कान्होजी आंग्रे घराण्याचे वंशज रघुजीराजे आंग्रे, भैरवीराजे आंग्रे, चंद्रहर्षा आंग्रे, आंतरराज्य छात्र जीवन दर्शन प्रकल्पाचे अध्यक्ष अतुल कुलकर्णी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या पुस्तकात मराठा आरमाराचा १५० वर्षांचा इतिहास, आंग्रे कालखंडातील समाज जीवन, न्यायव्यवस्था, नौकाबांधणी, व्यापार, युद्धजन्य परिस्थिती, अंतःकलह आदी घटनांचा ऊहापोह करण्यात आला असल्याची माहिती रघुजीराजे आंग्रे यांनी यावेळी दिली.

पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे पुनर्लेखन व संपादन दीपक पटेकर, संतोष जाधव व अंकुर काळे यांनी केले असून श्री समर्थ सेवा प्रकाशन, नाशिक यांनी हे पुस्तक प्रकाशित केले.

------------------

Web Title: The rich history of Maharashtra should also come in Hindi language - Governor Bhagat Singh Koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.