गुहागरवर राज्य करणारा श्रीमंत माणूस हरपला

By admin | Published: February 10, 2016 11:22 PM2016-02-10T23:22:52+5:302016-02-11T00:28:25+5:30

सामान्यजनांची हळहळ : सुशील वेल्हाळ यांच्या निधनाने अनेकांच्या डोळ्यात पाणी

The rich man who ruled in Guhagar wasted | गुहागरवर राज्य करणारा श्रीमंत माणूस हरपला

गुहागरवर राज्य करणारा श्रीमंत माणूस हरपला

Next

संकेत गोयथळे -- गुहागर  तालुक्यात जवळपास सर्वच क्षेत्रात कोणतीही अपेक्षा न ठेवता कोणाच्याही वाईट प्रसंगी धावून येणाऱ्या सुशील अप्पा वेल्हाळ यांच्या निधनाने आजवर सर्वांनी अनुभवलेला मनाचा श्रीमंत माणूस हरपला, अशी शोकाकूल भावनिक प्रतिक्रिया जनतेमधून व्यक्त होत आहे.
सुशील अप्पा वेल्हाळ हे सुरुवातीला कस्टम खात्यामध्ये कामावर होते. कोणाचीही बॉसिंग न आवडणाऱ्या अप्पांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला. खऱ्या अर्थाने सुशील अप्पा एन्रॉन कंपनी कार्यरत असताना नावारुपास आले. कंपनीचे काम पाहणारे त्यावेळचे प्रमुख संजीव खांडेकर यांच्याशी थेट संबंध असल्याने स्थानिकच नव्हे; तर जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित तरुणांना नोकरीला लावले. म्हणूनच जेव्हा कंपनी याकडे कानाडोळा करु लागली, तेव्हा शृंगारतळी येथे जनमोर्चा काढून संजीव खांडेकर यांची गाडी भर रस्त्यात अडवून खांडेकर यांच्या तोंडाला काळे फासले होते. जेव्हा जेव्हा एन्रॉनचा विषय येतो, तेव्हा तेव्हा या घटनेची आठवण सर्वांना होते.
एवढा दबदबा कंपनीमध्ये असूनही स्वत: पैसे कमावण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. तात्या नातूंपासून सुशील वेल्हाळ भाजपमध्ये कार्यरत होते. त्यांची पत्नी सुचिता वेल्हाळ यांनी पंचायत समितीचे सभापती पदही भूषविले. याचवेळी त्यांचे राष्ट्रवादी पक्षप्रमुख शरद पवार यांच्याशीही फार पूर्वीपासूनचे जवळचे संबंध होते. मागील गुहागर दौऱ्यावेळी शरद पवार कृषिमंत्री असताना नियोजित नसतानाही वेल्हाळ यांच्या फार्महाऊसवर भेट देऊन विचारपूस केली.
यावेळी राष्ट्रवादीमध्ये असताना प्रमुख पुढाऱ्यांशी अबोला असताना शरद पवार सुशील वेल्हाळ यांच्या घरी गेल्याने अनेकांच्या भुवया उंंचावल्या होत्या. अशाच कारणातून अलिकडच्या काळात पक्षीय राजकारणापासून ते दूर होते. गुहागर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक काशिनाथ कट्टेपाटील व सुशील वेल्हाळ यांच्यामधील तात्वीक वाद अनेक महिने चर्चेत होता. यामधून एकवेळा रस्ता बंद आंदोलन केल्यानंतर पोलीस अधीक्षकांना येऊन तोडगा काढावा लागला होता.
अनेकवेळा मोठ्या कार्यक्रमाच्या वेळी हजर असताना कधीही स्टेजवर बोलावूनही न जाता पाठीमागे उभे राहून कार्यक्रम पाहात असत. कुणी जबरदस्ती केल्यास अशा कार्यक्रमामध्ये येण्याची मला आवड नाही. कोणा अनोळखीच्या मृत्यूनंतर मयताला मी न बोलावता पुढे येईन, असे मिश्कीलपणे सांगत.
गुहागर तालुक्यातील सर्वांत मोठा दांडिया खेळ नीळकंठेश्वर मंडळाच्या नावाखाली गेली २५ वर्षे स्वबळावर चालू ठेवला होता. पुढील अनेक वर्षे अशा चौफेर सर्व क्षेत्रातील सामाजिक कार्यामुळे सुशील अप्पा सर्वांच्याच स्मरणात राहणार आहेत.


तत्परतेने प्रसंगाला धावणारा
गुहागरमध्ये पर्यटन वाढत असताना समुद्रामध्ये पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला अथवा कोणत्याही रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये कोणीही व्यक्ती असल्यास सर्व काम बाजूला ठेवून आपल्या चारचाकीसह ते सदैव तत्पर असत.

Web Title: The rich man who ruled in Guhagar wasted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.