आजपासून रिक्षा, टॅक्सीचा प्रवास ३ रुपयांनी महाग; मुंबईकर प्रवाशांच्या खिशाला अधिकचा भार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 06:03 IST2025-02-01T06:02:35+5:302025-02-01T06:03:05+5:30

Mumbai Auto Taxi Fare Hike: मीटर रिक्षा-टॅक्सीचे नवे दर लागू; खिशाला चटके.

rickshaw and taxi travel will be more expensive by Rs 3 From today | आजपासून रिक्षा, टॅक्सीचा प्रवास ३ रुपयांनी महाग; मुंबईकर प्रवाशांच्या खिशाला अधिकचा भार

आजपासून रिक्षा, टॅक्सीचा प्रवास ३ रुपयांनी महाग; मुंबईकर प्रवाशांच्या खिशाला अधिकचा भार

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात ३ रुपयांनी तसेच कूल कॅबच्या दरात ८ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांच्या खिशाला अधिकचा भार सोसावा लागणार आहे.

नव्या दरानुसार भाडेवाढ करण्यासाठी मीटरमध्ये फेरबदल करण्याची मुदत एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत असून तोपर्यंत सुधारित भाडे आकारणीचा चार्ट देण्यात आला आहे. प्रस्तावित दरानुसार रिक्षाचे भाडे ११ टक्के आणि टॅक्सीचे भाडे १० टक्के वाढले आहे. तसेच कूल कॅबच्या भाड्यातही २० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त भुर्दड सहन करावा लागणार आहे.

Web Title: rickshaw and taxi travel will be more expensive by Rs 3 From today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.