मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात ३ रुपयांनी तसेच कूल कॅबच्या दरात ८ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांच्या खिशाला अधिकचा भार सोसावा लागणार आहे.
नव्या दरानुसार भाडेवाढ करण्यासाठी मीटरमध्ये फेरबदल करण्याची मुदत एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत असून तोपर्यंत सुधारित भाडे आकारणीचा चार्ट देण्यात आला आहे. प्रस्तावित दरानुसार रिक्षाचे भाडे ११ टक्के आणि टॅक्सीचे भाडे १० टक्के वाढले आहे. तसेच कूल कॅबच्या भाड्यातही २० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त भुर्दड सहन करावा लागणार आहे.