भाडे नाकारल्याने रिक्षाचालकाची हत्या!

By admin | Published: July 26, 2015 02:43 AM2015-07-26T02:43:07+5:302015-07-26T02:43:07+5:30

भाडे नाकारले म्हणून चौघा जणांनी रिक्षावाल्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली भागात घडली. शनिवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास ही घटना घडली.

Rickshaw driver murdered by denial of rent! | भाडे नाकारल्याने रिक्षाचालकाची हत्या!

भाडे नाकारल्याने रिक्षाचालकाची हत्या!

Next

डोंबिवली : भाडे नाकारले म्हणून चौघा जणांनी रिक्षावाल्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली भागात घडली. शनिवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास ही घटना घडली.
गणेश जयस्वाल, गणपत मढवी चाळ, आयरे रोड, डोंबिवली पूर्व असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. रिक्षावाल्याची हत्या करणारे पाचही जण नशेत होते. प्रगती कॉलेजजवळ आरोपींनी जयस्वाल यांची रिक्षा अडवली. आम्हाला नांदिवलीत सोड, असे त्यांनी जयस्वाल यांना सांगितले. मात्र, रात्र फार झाल्याने मी तिकडे येऊ शकत नाही, असे सांगत जयस्वाल यांनी त्यांना नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात त्यांनी जयस्वालवर हल्ला केला. त्यांच्या अंगावर वार करण्यात आले. गंभीररीत्या जखमी झालेल्या जयस्वाल यांना रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. शनिवारी सकाळी नशा उतरल्यानंतर रिक्षावाल्याची हत्या करणाऱ्यांपैकी एका आरोपीने पोलीस ठाणे गाठून आपल्या गुन् ह्याची कबुली दिली. त्यानुसार, विनोद माणिक वाकळे (१९) रा. प्रसाद चाळ, शांतीनगर जैन मंदिर, शिवनिवास बसप्पा सुगाळा (१९), रा. माऊलीनगर, तुकाराम कृपा चाळ, नांदिवली टेकडी, प्रशांत संजय फळे (१८) रा. अनंत निवास चाळ, रूम ४, दत्तनगर, अनंत शंकर देवकर (२५) रा. दत्तनगर, नागेश्वर कृपा, बी. विंग, रूम ३ आणि राकेश इंगळे, भोपर- सर्व राहणारे डोंबिवली पूर्व अशी पाच आरोपींची नावे असल्याचे रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिवरकर यांनी सांगितले. त्यानंतर, पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांनी नशा केली होती की नाही, याबाबत डोंबिवली पोलीस संभ्रमात असून मानपाडा पोलिसांनी मात्र त्यास दुजोरा दिला होता.

Web Title: Rickshaw driver murdered by denial of rent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.