रिक्षा ड्रायव्हरची मुलगी झाली उपविजेती मिस इंडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:07 AM2021-02-23T04:07:53+5:302021-02-23T04:07:53+5:30

मनोहर कुंभेजकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जर मनात इच्छा व प्रबळशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट कठीण नाही. एकीकडे ...

Rickshaw driver's daughter becomes runner-up Miss India | रिक्षा ड्रायव्हरची मुलगी झाली उपविजेती मिस इंडिया

रिक्षा ड्रायव्हरची मुलगी झाली उपविजेती मिस इंडिया

Next

मनोहर कुंभेजकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जर मनात इच्छा व प्रबळशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट कठीण नाही. एकीकडे रिक्षा ड्रायव्हर वडील दिवस रात्र मेहनत करून कुटुंबाचा गाढा चालवीत असताना मोलमजुरी, भांडी घासून किशोरवयात शिक्षण करणारी आणि नंतर कॉल सेंटरमध्ये मान्या सिंह हिने काम केले. अनेक रात्री ती उपाशीपोटी झोपत असे. हातात पैसे नसल्याने बस किंवा रिक्षाने प्रवास न करता ती पायपीट करायची.

कांदिवली (पूर्व ) ठाकूर व्हिलेजमध्ये राहणारी १९ वर्षीय मान्या ओमप्रकाश सिंह हिने फेमिना मिस इंडिया उपविजेती हा बहुमान मिळविला आहे. सर्वंस्तरावर तिचे स्वागत होत आहे. वडिलांच्या रिक्षातून तिची नुकतीच ठाकूर व्हिलेजमध्ये मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी आईने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी केलेली मोलमजुरी आणि वडिलांचे कष्ट या आठवणींना उजाळ देत तिने वडिलांना मिठी मारली. यावेळी डोळ्यात अश्रू आलेल्या भावुक मान्याचा हा क्षण अनेकांनी त्यांच्या मोबाईलमधून टिपला आणि तिचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.

उत्तर मुंबईचेे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी त्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ आणि शाल देऊन भेट देऊन नुकताच तिचा सन्मान केला. मान्या सिंह हिच्या घवघवीत यशाबद्धल तिने देशात उत्तर मुंबईचा गौरव केला ही अभिमानाची बाब असून, मान्या सिंह हिने रक्त, घाम गाळून प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर हा बहुमान मिळविला असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

Web Title: Rickshaw driver's daughter becomes runner-up Miss India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.