सीएनजीच्या स्फोटात रिक्षा खाक

By admin | Published: June 28, 2014 12:41 AM2014-06-28T00:41:48+5:302014-06-28T00:41:48+5:30

धूर येऊन उलटलेल्या रिक्षातून किरण लाड या 64 वर्षाच्या आजोबांनी आपल्या अडीच वर्षाच्या नातवाला सुखरूप बाहेर काढले.

Rickshaw khak in CNG blast | सीएनजीच्या स्फोटात रिक्षा खाक

सीएनजीच्या स्फोटात रिक्षा खाक

Next
>मुंबई : स्कूल बसमधून प्रवास करणो असुरक्षित वाटल्याने नातवाला रिक्षातून नेताना धूर येऊन उलटलेल्या रिक्षातून किरण लाड या 64 वर्षाच्या आजोबांनी आपल्या अडीच वर्षाच्या नातवाला सुखरूप बाहेर काढले. त्याच वेळी रिक्षातील सीएनजी गॅसचा स्फोट होऊन रिक्षाने पेट घेतला.  या घटनेत नातू किरकोळ जखमी झाला.  
किरण लाड यांचा नातू अभय हा पवई येथील पोतदार स्कूलच्या नर्सरीत जातो. मंगळवारी पोतदार स्कूल बसला विक्रोळी गांधीनगर परिसरात एका झाडाला धडक होऊन अपघात झाला होता. त्यात चारजण जखमी झाल्याने किरण लाड यांनी स्कूल बसमधून प्रवास करणो असुरक्षित वाटले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून ते नातवाला रिक्षानेच नर्सरीत नेत होते. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शाळेत जाण्यासाठी त्यांनी रिक्षा पकडली. घाटकोपर आर सीटी मॉलर्पयत पोहचताच अचानक रिक्षातून धूर येऊ लागला. त्यामुळे घाबरलेला रिक्षाचालक मनोज तिवारी याने स्वत:च्या बचावासाठी रिक्षातून बाहेर उडी मारली. मात्न त्याचा शर्ट रिक्षाच्या स्टेअरिंगमध्ये अडकला आणि त्यामुळे तोल जात रिक्षा भररस्त्यात उलटली. या अपघातात अभयच्या डोक्याला मार लागला व त्यातून रक्तस्त्नाव होऊ लागला.  लाड यांनी रिक्षातून कसेबसे बाहेर येत आधी रिक्षा सरळ केली आणि नातवाला बाहेर काढले. तोच रिक्षातील सीएनजी गॅसचा स्फोट झाला व रिक्षाने पेट घेतला. काही क्षणातच रिक्षा जळून खाक झाली. 
यावेळी आर सीटी मॉल बसथांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांनी घाबरून पळ काढला. या घटनेत जखमी झालेल्या अभयला पाच ते सहा टाके पडल्याचे किरण लाड यांनी लोकमतला सांगितले. या अपघातात किरण लाड यांनाही जबर मुका मार बसला.  (प्रतिनिधी)

Web Title: Rickshaw khak in CNG blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.