२00 रुपयांचा रिक्षा परवाना आता १५ हजाराला
By admin | Published: February 13, 2016 02:00 AM2016-02-13T02:00:43+5:302016-02-13T02:00:43+5:30
वाहन परवाना शुल्कात शासनाकडून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमित कागदोपत्री पूर्तता करून पूर्वी २00 रुपये भरून मिळणाऱ्या नवीन रिक्षा परवान्याचे शुल्क १५ हजार रुपये,
मुंबई : वाहन परवाना शुल्कात शासनाकडून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमित कागदोपत्री पूर्तता करून पूर्वी २00 रुपये भरून मिळणाऱ्या नवीन रिक्षा परवान्याचे शुल्क १५ हजार रुपये, तर टॅक्सी परवान्याचे शुल्क २५ हजार रुपये करण्यात आले आहे. ११ फेब्रुवारीपासून त्याच्या अंमलबजावणीसही सुरुवात केल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.
अत्यंत अल्प प्रमाणात परवाना मिळाल्यानंतर काही चालक हाच परवाना लाखो रुपयांना विकतात. मात्र याचा परिवहन विभागाला काहीच फायदा होत नाही. उत्पन्न वाढावे यासाठी वाहन परवाना शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. नव्या शुल्कानुसार रिक्षा परवाना जारी करताना आता मुंबई महानगर प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रासाठी १५ हजार रुपये आणि मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रासाठी १० हजार रुपये आकारण्यात येईल. त्याचप्रमाणे नवीन टॅक्सी परवानाही मुंबई महानगर क्षेत्र प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रासाठी २५ हजार रुपये आणि त्याव्यतिरिक्त इतर क्षेत्रासाठी २० हजार रुपये आकारण्यात येणार आहे. अंतिम तारखेपर्यंत परवान्याचे नूतनीकरण करण्यास उशीर झाल्यास अशा अर्जासाठी प्रत्येक महिन्यासाठी किंवा त्याच्या भागासाठी प्रति वाहन शुल्क १00 रुपयांवरून तब्बल ५ हजार रुपये करण्यात आले आहे.
अन्य परवान्यांमध्येही झालेली वाढ पुढीलप्रमाणे
परवान्याचा प्रकारजुने शुल्कनवीन शुल्क
१) मीटर बसविलेल्या मोटार कॅबसाठी२00 रु१000 रु
परवाना देणे किंवा परवान्याचे नवीकरण
२) मीटर न बसविलेल्या मोटार कॅबसाठी ५00 रु१000 रु
परवाना देणे किंवा परवान्याचे नवीकरण
३) मॅक्सी कॅबसाठी परवाना देणे किंवा ३५0रु१000 रु
परवान्याचे नवीकरण
४) टप्पा वाहनांसाठी परवाना देणे किंवा ४00 रु१000 रु
परवान्यांचे नवीकरण३00 रु१000 रु
५) माल वाहतूक वाहनांसाठी परवाना६00 रु१000 रु
देणे किंवा परवान्यांचे नवीकरण४00 रु१000 रु
६) खासगी सेवा वाहनांसाठी परवाना देणे ४00 रु१000 रु
किंवा परवान्यांचे नवीकरण३00 रु१000 रु
७) पर्यटक कॅबसाठी परवाना देणे किंवा ६00 रु१000 रु
नवीकरण४00 रु१000 रु
८) पर्यटक कॅबव्यतिरिक्त अन्य पर्यटन६00 रु१000 रु
वाहनांसाठी परवाना देणे किंवा नवीकरण४00 रु १000 रु
९) राष्ट्रीय परवाना देणे किंवा नवीकरण७00 रु२000 रु
१0) तात्पुरता परवाना देणे २00 रु१000 रु
११) टप्पा वाहतूक, मालवाहतूक, कंत्राटी २00 रु१000 रु
परवान्यांवरील वाहन बदली करणे.