मुंबई : मुंबई महानगर क्षेत्राकरिता रिक्षा परवाना देताना असलेले १५ हजार आणि १० हजार रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येते. हे शुल्क म्हणजे आॅटोरिक्षा चालकांची लूट करण्यासारखे आहे. ते त्वरित रद्द करावे आणि २00 रुपये आकारणी करून परवान्यांचे वितरण करावे, अशी प्रमुख मागणी मुंबई आॅटोरिक्षामेन्स युनियनकडून करण्यात आली. या मागणीसह अन्य मागण्यांसाठी १९ जानेवारी रोजी वांद्रे येथील परिवहन आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल. यावेळी हजारो रिक्षाचालक सामील होणार असल्याचे युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्याने उपनगरातील रिक्षा वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राजरोसपणे चालणाऱ्या वाहतुकीवर शासनाचे निर्बंध नसल्याचेही राव म्हणाले. गेल्या १८ वर्षांत एकही नवा परवाना राज्य शासनातर्फे देण्यात आलेला नसून, तीन वर्षांपेक्षा अधिक काळ लायसन्स धारण करणाऱ्या आॅटोरिक्षा चालकांना त्वरित बॅज द्या, अशी मागणीही त्यांनी केली. अन्य मागण्यामुंबईच्या प्रवाशांना सेवा देण्याकरिता आॅटोरिक्षाचे नवीन एक लाख परवान्यांचे वितरण त्वरीत करावे. आॅटोरिक्षा चालक-मालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना विनाविलंब करावी. आॅटोरिक्षा मालक-चालकांना पब्लिक सर्व्हण्टचा दर्जा मिळावा. आॅटोरिक्षा चालक-मालकांना कमी दरात घरे उपलब्ध करून द्या.
रिक्षाचालकांचे धरणे आंदोलन
By admin | Published: January 14, 2016 2:28 AM