रिक्षा, टॅक्सी मीटर अद्ययावतीकरणाला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:07 AM2021-09-19T04:07:52+5:302021-09-19T04:07:52+5:30

मुंबई : कोरोनाकाळात रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ लागू केल्यानंतर नवे दर मीटरमध्ये दिसण्यासाठी आवश्यक असणारी मीटर अद्ययावतीकरण प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. ...

Rickshaw, taxi meter update extended till November? | रिक्षा, टॅक्सी मीटर अद्ययावतीकरणाला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ?

रिक्षा, टॅक्सी मीटर अद्ययावतीकरणाला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ?

Next

मुंबई : कोरोनाकाळात रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ लागू केल्यानंतर नवे दर मीटरमध्ये दिसण्यासाठी आवश्यक असणारी मीटर अद्ययावतीकरण प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्याची मुदत ऑगस्टमध्ये संपली असून, परिवहन विभाग नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या २२ फेब्रुवारीच्या बैठकीत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना भाडेवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच मीटर अद्ययावतीकरण करण्यासाठी ३१ मे २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या निर्देशाप्रमाणे रिक्षा आणि टॅक्सी मीटरचे कामकाज १५ एप्रिल २०२१ पासून होऊ शकले नाही. रिक्षा, टॅक्सी मीटर अद्ययावतीकरणाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या ३१ मे रोजीच्या बैठकीत घेण्यात आला होता. ही मुदत आता नोव्हेंबरपर्यंत देण्यात येणार आहे. आगामी बैठकीत यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. मीटरमध्ये फेरबदल न करता प्रवासी वाहतूक केल्यास संबंधित रिक्षा-टॅक्सीवर कठोर कारवाई करण्याची तरतूदही करण्यात येत आहे, असे एका प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेशात सध्या १० हजार ७३९ टॅक्सी आणि १ लाख ३२ हजार २८२ रिक्षा यांच्या मीटरमधील फेरबदल पूर्ण झाले आहे. सरकारी नोंदणीनुसार एमएमआरमध्ये अधिकृतपणे ५२ हजार ७४९ टॅक्सी आणि ७ लाख ५४ हजार ६७० रिक्षा आहेत.

फेरबदल करण्यास तीव्र नाराजी

कोरोना काळात आर्थिक मदत रिक्षा टॅक्सी चालकांना करावी, अशी मागणी सरकारकडे केली. मात्र संघटनांचा विरोध असतानाही सरकारने भाडेवाढ दिली. लोकलमध्ये सर्वसामान्यांना मुभा नसल्याने त्याचा परिणाम या स्वयंरोजगाराच्या व्यवसायावर झाला आहे. दुसरीकडे मीटरमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी एक हजार ते दीड हजार रुपये खर्च येतो. शिवाय फेरबदल करण्यासाठी आरटीओ परवानगी आणि अन्य प्रक्रियेसाठी दोन दिवस मीटर काढावे लागते. यामुळे अद्याप अनेक चालकांमध्ये फेरबदल करण्यास तीव्र नाराजी आहे, असे रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून सांगण्यात येते.

Web Title: Rickshaw, taxi meter update extended till November?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.